माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे

माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे - केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई : माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये. असे वक्तव्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

भाजपचे मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर राणे यांनी याबाबत त्यांच्या फेसबुक पेजवरून आपले म्हणणे मांडले आहे.

दरम्यान, मंत्री राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना झाले असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.