Tag: Dr Nagnath Kottapalle

“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पिंपरी : “शेतकरी, कामगार, देवदासी, अस्पृश्य समाज यांच्या उद्धारासाठी निस्पृह वृत्तीने विठ्ठल रामजी शिंदे यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यामधील दुवा म्हणजे वि. रा. शिंदे यांचे कार्य. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर निस्पृह वृत्तीने काम केले. ते खऱ्या अर्थाने महर्षी या पदवीला पात्र होते. त्यांच्या उपेक्षित कार्याला समाजापुढे आणण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले.” असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नागनाथ कोत्तापल्ल...