पोलिस आयुक्तालयात झाले ‘बंद पडलेले हृदय चालू ठेवण्याचे प्रात्यक्षित’
चिंचवड : १६ ऑक्टोबर हा जागतिक भुलतंत्र दिवस. डॉ. विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन ह्या शास्त्रज्ञाने सोळा ऑक्टोबर १८४६ या दिवशी पहिली भूल दिली होती. हे औचित्य साधून जगभरात हा दिन जागतिक भूल तंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड भूलतज्ञ संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हा दिवस, बंद पडलेले हृदय चालू करण्याचे "जीवन संजीवनी" हे प्रात्यक्षिक दाखवून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सहाय्यक आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित भूल तज्ज्ञांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडून कृत्रिम मानव देहावर प्रत्यक्षित करवून घेतले. सामान्य माणसांत भूल तज्ञांचे काम फक्त भूल देण्याचे असते, असा समज असतो. परंतु, भुलतज्ञांचे काम फक्त भूल देण्या पुरते मर्यादित नसून, ऑपरेशन दरम्यान नाडीचे ठोके कमी जास्त झाल्यास, रक्तदाब कमीजास्त कमीजास्त झाल्यास, अचानक रक्तस्त...