ऑनलाईन शिक्षण आणि आपण
डॉ. किरण मोहिते
२०२० साली महाराष्ट्रात (corona virus) करोना विषाणूचा उद्रेक झाला. त्या वर्षापासून महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. करोना आणि (Lockdown) टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. करोनानंतरच्या काळात शाळा कशा असतील? याची चर्चा विविध व्यासपीठावर घडली. त्यात प्रामुख्यान (Online Education) ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. अशा ऑनलाइन मंचाची खरोखर गरज आहे का? अशा व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? कोविड-१९ (Covid-19) ने सर्वच क्षेत्रापुढे काही मूलभूत प्रश्न उभे केले त्यास शैक्षणिक क्षेत्र ही अपवाद नाही.
करोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्र सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवणे हा हेतू होता या पार्श्वभूमीवर ऑनलाइन ...