Tag: Elections

श्री नगद नारायण, गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय
महाराष्ट्र

श्री नगद नारायण, गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क हाजीपुर, बीड (दि. 20 डिसेंबर) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज सर्वत्र जाहीर झाले. विजय उमेदवारांचे गुलाल, ढोल-ताशे आणि डीजेच्या आवाजामध्ये सर्वत्र आनंद उत्सव आणि जल्लोषात स्वागत होत आहे. याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हाजीपुर गावची ग्रामपंचायत निवडणूक ही मोठ्या उत्साहात पार पडली. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आज पर्यंत गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध म्हणून गणली जात होती. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीला पहिल्यांदाच दोन पॅनल गावामध्ये पडले आणि प्रथमच निवडणूक गावामध्ये झाली. श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल आणि श्री गोसावी बाबा ग्रामविकास पॅनल या दोन पॅनल मध्ये काट्याची टक्कर झाली. आणि यामध्ये श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल चे सर्वच्या सर्व उमेदवार हे मोठ्या फरका...
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता
राजकारण, मोठी बातमी

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. ७ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार स्वतःकडे घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंत्रिमंडळाने मंजूर केलेले विधेयक विधान सभेत मांडण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे महाराष्ट्र सरकार कायदा करणार आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे. निवडणूक आयोगाने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. मात्र राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईस तीन महिने अवधी हवा आहे. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचे घाट घातला आहे. म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी दोन व...