Tag: Ganesh Visarjan

PCMC : गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था
पिंपरी चिंचवड

PCMC : गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था

पिंपरी, ११ सप्टेंबर:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गणेश विसर्जनासाठी १०७ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली असून सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी विसर्जनासाठी मूर्ती द्याव्यात असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विसर्जन ठिकाणी गर्दी होवू नये या साठी सर्व विसर्जन घाट व हौदावर यावर्षी गतवर्षी प्रमाणे कोरोनामुळे निर्बंध आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उत्साही व आनंदी वातावरणात साजरा व्हावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.शहरातील विविध भागामध्ये श्री गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेने केली असून त्याचे विेधीवत विसर्जन करण्यात येणार आहे असेही महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. श्री मूर्ती संकलनासाठी स्वतंत्र सजवलेले रथ तयार केले...