Tag: Girish Kuber

लेखक गिरीश कुबेर यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक
पुणे

लेखक गिरीश कुबेर यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक

राज्यातील सर्व आमदारांकडे विधानसभेत आवाज उठविण्याची निवेदनाद्वारे केली मागणी पुणे : विश्ववंद्य छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण लेखक गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनी लिहिलेल्या “रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र” या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यातील सर्व आमदारांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. लेखक गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह ...
कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार
विशेष लेख

कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार

डॉ श्रीमंत कोकाटे 'रेनिसां 'ही व्यापक संकल्पना आहे. पंधराव्या शतकात रोमन साम्राज्यात रेनिसां झाला. त्यामुळे कला, शिल्पकला, साहित्य, विज्ञान, संगीत, चित्रकला यांचा विकास झाला. धार्मिक गुलामगिरीला आव्हान दिल्यामुळे अनिष्ट रूढी, परंपरा याविरुद्ध लढा उभारला गेला. ग्रंथप्रामाण्य नाकारून बुद्धिप्रामाण्यवादाला चालना मिळाली. धर्मगुरूंच्या आणि धर्मग्रंथांच्या जाचातून मुक्त होऊन युरोपमध्ये नवविचारांचा उदय झाला. त्यातूनच युरोपमध्ये औद्योगिक आणि आर्थिक क्रांती झाली. हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये जखडलेल्या जनतेला प्रबोधन चळवळीमुळे जगण्याची नवी उमेद मिळाली. रेनिसांमुळे त्यांना नवनिर्मितीची संधी मिळाली. वैचारिक क्रांती झाली. त्यातून कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञानाचा उदय आणि विकास झाला. धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून पोसलेल्या कर्मठ, सनातनी परंपरेला शह दिल्यामुळे युरोपमध्ये रेनिसां झाला. 'रे...
गिरीश कुबेर यांना का ‘काळं फासलं’? असं काय लिहिलंय त्यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी?
महाराष्ट्र, मोठी बातमी

गिरीश कुबेर यांना का ‘काळं फासलं’? असं काय लिहिलंय त्यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी?

नाशिक : पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : 'द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकातल्या मजकुरावरून याधीच वाद होता. नाशिकमधील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तो पुन्हा पुढे आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी या पुस्तकात, संभाजींवर गंभीर आणि आक्षेपार्ह लिखाण गिरीश कुबेर यांनी केलं असा आरोप करत, संभाजी ब्रिगेडने त्यांच्या तोंडाला आज नाशिकमध्ये काळं फासलं. याआधीच गिरीश कुबरे यांच्या या लिखाणाविषयी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड या कुबेर यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. या पुस्तकात वादग्रस्त मजकूर छापून गिरीश कुबेर यांना नेमकं साध्य तरी काय करायचं आहे? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. तसेच अनेक संघटनांनी कुबेर यांच्या पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी यापूर्वीच केली होती. आज अखेर संभाजी ब्रिगेडने गिरीश कुबेर यांच्या त...