Tag: Hasan Mushrif

बिबट्याच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी दिवसा वीज?
महाराष्ट्र, मोठी बातमी

बिबट्याच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी दिवसा वीज?

पालकमंत्री हसन मुश्रीफ करणार ऊर्जामंत्र्यांशी चर्चा अहमदनगर : जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळण्यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यावेळी कोरोना प्रादुर्भाव व संभाव्य दुसरी लाट, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेले नुकसान व मदतवाटप, जिल्ह्यात बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला...