Tag: Kalewadi

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानासाठी काळेवाडीत शिवसैनिकांचे विशेष योगदान
पिंपरी चिंचवड

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानासाठी काळेवाडीत शिवसैनिकांचे विशेष योगदान

पिंपरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने संपूर्ण काळेवाडी भागांमध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. दरम्यान, हे अभियान राबवत असताना सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शरीर तापमान चाचणी व ऑक्सिजन पातळी चाचणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. काळेवाडी भागातील नागरिकांना या अभियानाचा जास्तीत जास्त व्हावा यासाठी काळेवाडीतील चिंचवड विधानसभा प्रमुख हरेशआबा नखाते, काळेवाडी शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील, उपविभाग प्रमुख गणेश वायभट, रहाटणी विभाग प्रमुख प्रदीप दळवी, अंकुश कोळेकर, शाखाप्रमुख नरसिंग माने, उपविभाग संघटक रविकिरण घटकार, दत्ता गिरी, काळेवाडी विभाग संघटिका भाग्यश्री मस्के यांच्...
PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी चिंचवड

PCMC|काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

रस्ते डांबरीकरणाच्या लेखी आश्वासनाचा अधिकाऱ्यांना पडला विसर काळेवाडी (लोकमराठी) : विविध विकास कामांसाठी खोदण्यात आलेल्या काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन दखल घेत नाही. विशेष म्हणजे रस्ते डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देऊनही प्रशासन गंभीर नसल्याने रस्ते दुरूस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. पाणीपुरवठा वाहिनी, सांडपाणी वाहिनी तसेच खासगी टेलिफोन कंपन्यांची केबल टाकण्यासाठी ज्योतीबानगर, राजवाडेनगर, कोकणेनगर परिसरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, त्यांची दुरूस्ती योग्य पद्धतीने न झाल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. काही रस्ते विविध कामांसाठी सतत खोदल्याने रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी पसरली आहे. त्यामुळे घसरून पडण्याचे अपघात नित्याचेच...
काळेवाडीत भररस्त्यात कारने घेतला पेट
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत भररस्त्यात कारने घेतला पेट

पिंपरी चिंचवड, (लोकमराठी) : काळेवाडी येथे भर रस्त्यात कारने पेट घेतला. काळेवाडीकडून पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डी मार्टजवळ आज, रविवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीकडून पिंपरीच्या दिशेने येत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. काही नागरिकांनी पाणी टाकुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने आणखीनच वाढली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनतर आग आटोक्यात आली. दरम्यान, यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती....