PIMPRI : पिंपरी मार्केट येथे वाहन मुक्त दिनानिमित्त लहान मुले,ज्येष्ठ नागरिक, महिलांनी घेतला मनमुराद फिरण्याचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद
महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांकडून कौतुक
पिंपरी, दि. ९ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) अशा प्रकारचा पहिलाच वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अबालवृद्धांनी घेतला. लहान मुले, महिलांचा देखील मोठा सहभाग या उपक्रमात दिसून आला.
वाहन मुक्त दिनानिमित्त रस्ते सुरक्षा, कमी प्रदूषण क्षेत्र, पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकचे महत्त्व, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सहभागावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. सर्व वयोगटांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम देखील येथे पार पडले. कार्यक्रमस्थळी संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर उ...