Tag: lockdown

पिंपरी चिंचवडमधील लाॅकडाऊनच्या अफवेवर विश्वास ठेवू नये – आयुक्त
पिंपरी चिंचवड, वायरल

पिंपरी चिंचवडमधील लाॅकडाऊनच्या अफवेवर विश्वास ठेवू नये – आयुक्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लाॅकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे....
Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)
पुणे, मोठी बातमी

Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)

लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : उरूळी कांचनजवळील एका घरात भलामोठा साप शिरला, आणि सगळ्यांचीच पाचावर धारणा झाली. आतील सर्वांनी घराबाहेर पळ काढला. मात्र, घरातील खाटेवर असलेल्या वयोवृद्ध आजीजवळ दोन चिमुरड्यांनी आसरा घेतला. अशा घाबरलेल्या परिस्थितीत कोणालाच काही कळेना. त्याचवेळी सर्पमित्र लक्ष्मण पांचाळ यांना फोन करून कळविण्यात आले. लॉकडाऊन असतानाही पांचाळ व त्यांची पत्नी सीमा यांनी चिंचवड येथून 39 किलोमीटरचा प्रवास करत सापाला पकडून जंगलात सोडून दिले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारी (ता. 25) दुपारी ही घटना घडली. उरूळी कांचन जवळील महाराजा आकादमी येथे एका घरात सुमारे सात फुट लांबीचा साप शिरला. त्यावेळी सर्वांनीच घरातून धुम ठोकली. मात्र, दोन चिमुरड्यांनी घरातच खाटेवर असलेल्या आजीजवळ जीव मुठीत धरून...
Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार
सामाजिक, महाराष्ट्र

Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार

उस्मानाबाद : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (परांडा) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील कालभैरवनाथ मंदिर सुरक्षिततेसाठी भाविकांसाठी बंद असल्याने माकडांना खायला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व सोनारी ग्रामस्थांच्या वतीने खाद्य पुरविण्यात सुविधा केली आहे. या सुविधेचा शुभारंभ मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, कोषाध्यक्ष रविंद्र खुळे, सहसचिव अशोक माने, सदस्य भिमा घाडगे, डोनजे गावचे सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, संतोष भोरे, बापू शिंदे, विलास शिंदे, दिनेश घोगरे, सचिन भोरे, विनायक गंगाविठ्ठल, अक्षय भोरे, अक्षय भोरे अशोक भोरे, चंद्रकांत भोरे, हनुमंत ...
Lockdown : पिंपरीत जूनपर्यंत कर सूट
पिंपरी चिंचवड

Lockdown : पिंपरीत जूनपर्यंत कर सूट

आयुक्तांचा ३०० गृहसंस्थांशी वेबसंवाद, प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी : पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित वेबसंवादात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे आदींनी संवाद साधला आणि तब्बल तीनशे नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन केले. महापालिकेने कर भरण्यासाठी जूनपर्यंत सूट दिली असून या काळात कोणताही दंड आकारला जाणार नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात हर्डीकर म्हणाले की, शहरातील गृहनिर्माण सोसायटय़ांपुढे पालिकेच्या करांबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. तूर्त पालिकेने जूनपर्यंत कर भरण्याची सूट दिली आहे. मात्र, मालमत्ता करात सवलत देण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आर्थिक स्थितीचे विश्लेषण करून या विषयी योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन आयु...
मद्याचा ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे

मद्याचा ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे (लोकमराठी) : टाळेबंदी काळात अवैधरीत्या परराज्य आणि जिल्ह्य़ांमधून पुण्यात मद्य आणण्याच्या प्रकरणांमध्ये, तसेच शहरासह जिल्ह्य़ात मद्याची वाहतूक केल्याच्या प्रकरणांमध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मद्य तसेच वाहने वगैरे मिळून तब्बल ८३ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी २०१ गुन्हे दाखल झाले असून ४५ जणांना अटक करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी लागू करण्याआधीच पुण्यात करोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जमाव आणि संचारबंदी लागू केली होती. याबरोबरच जिल्हाधिकारी राम यांनी शहरासह जिल्ह्य़ातील मद्यविक्रीची दुकाने, तसेच मद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश प्रसृत केले होते. परिणामी २० मार्चपासून मद्...
लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा
महाराष्ट्र

लॉकडाऊनच्या काळात कोकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा

मुंबई, (लोकमराठी) : कोंकण विभागात मंजूर १०५ शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. २२ हजार ७५४ थाळ्यातून लोकांना लाभ दिला जातो अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. १०५ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यात एका वेळेस २२ हजार ७५४ थाळ्यांची विक्री केली जाते. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपायोजना केल्या आहेत. राज्यातील कोणीही माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रासह सामुहीक भोजन व्यवस्था निर्माण केली आहे. कोंकण विभागात जिल्हा निहाय शिवभोजन केंद्रांची माहिती अशी आहे. ठाणे २ केंद्र ४०० थाळया, पालघर १२ केंद्र २ हजार १०० थाळ्या, रायगड २४ केंद्र २ हजार थाळ्या, रत्नागिरी १४ केंद्र १ हजार ३५० थाळ्या, सिंधुदूर्ग ११ केंद्र ७५० थाळ्या अशी कोंकण विभागात एकूण ६३ शिवभोजन केंद्र व ६ हजार ६०० थाळ्यांना मंजूरी मिळाली असून एमटीआरए (मुंबई-ठाणे रेशनिंग एरिया...
Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा
पिंपरी चिंचवड

Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा

पिंपरी (लोकमराठी) : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे अनेक नागरिक आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. मात्र आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या काळात वैद्यकीय अथवा मृत्यू किंवा अन्य अत्यावश्यक आपत्कालीन कारणास्तव पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतू राज्यातील अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास ची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे ज्यांना खरच गरज आहे अशा व्यक्तींना आता इच्छित ठिकाणी जाता येणार आहे. मात्र, हा ई-पास केवळ अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहे असं नमूद करण्यात आलं आहे. https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन आवश्यक असलेली कागदपत्र आणि फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून यामुळे शहरातील एकाचा मृत्यू देखील झाला आहे...
Covid-19 : पुण्यातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील, पाहा ही यादी
पुणे

Covid-19 : पुण्यातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील, पाहा ही यादी

पुणे (लोकमराठी) : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही महापैरांनी केली. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या सर्वांसाठी पुणे पोलिसांनी दिलेले पास १४ एप्रिलऐवजी आता ३० एप्रिलपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय मुदत वाढवल्याची माहिती नागरिकांना मेसेजद्वारे प्राप्त होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. दाट वस्तीमधील करोनाबाधित आणि संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नव्याने २२ ठिकाणांमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. पाहूयात कोणते २२ भाग सील करण्यात आले आहेत. सील करण्यात येत असलेले भाग…१) पत्राचाळ, लेन नंबर १ ते ४८ आणि परिसर, प्रभाग क्रमांक २०२) संपूर्ण ताडीवाला रोड३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग...
Lockdown: दोन तरूण देताहेत 270 विद्यार्थ्यांना मोफत जेवण
पिंपरी चिंचवड

Lockdown: दोन तरूण देताहेत 270 विद्यार्थ्यांना मोफत जेवण

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोनाच्या पाश्वभुमीवर संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे जेवणाचे मोठे हाल होत आहेत. अशा परिस्थित दोन तरूणांनी पुढाकार घेत श्री धनंजय मुंढे युवा मंचच्या माध्यमातून 270 विद्यार्थ्यांना मोफत घरपोच जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. विजय वडमारे व सचिन बढे अशी या तरूणांची नावे आहेत. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असल्याने भारत सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्च पासून संपुर्ण देशात संचार बंदी लागू केली. त्यामुळे खानावळी व हॉटेल बंद करण्यात आली. परिणामी परराज्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून शहरात शिक्षण व स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे मोठे हाल सुरू झाले. विजय वडमारे व सचिन बढे ही बाब लक्षात घेता विजय वडमारे व सचिन बढे यांनी 270 विद्यार्थ्यांची जेवणाची मोफत सोय केली आहे. पिंपरीत...