पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्यापासून महाअभियान; अयोध्येतील अक्षता पोहचणार घराघरात
पिंपरी दि.३१ (लोकमराठी)- अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पिंपरी चिंचवड समितीच्यावतीने दि.१ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत शहरातील घरोघरी जावून श्रीरामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अयोध्या येथील पूजित मंगल अक्षता वितरण करण्यात येणार आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासह देहू, आळंदी, देहूरोड कॅन्टोन्मेंट , हिंजवडी ग्रामपंचायत परिसरात हे निमंत्रण महाअभियान होणार आहे.
श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पिंपरी चिंचवड समितीतर्फे शहर संयोजक धनंजय गावडे, सहसंयोजक महेश्वर मराठे, विश्व हिंदू परिषद पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी ही माहिती दिली. या निमित्ताने संपूर्ण देश, शहर पुन्हा राममय व्हावे, या हेतूने श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासातर्फे, पिंपरी चिंचवड समितीने हे अभियान आ...