पक्षपातीपणा कोण करतंय, मुस्लिमद्वेष्ट्ये हिंदुत्ववादी की प्रदूषण नियंत्रण मंडळ?
जेट जगदीश
'प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन' 23 ऑगस्टच्या लोकसत्तेतील या बातमीत, 'पाच वेळा मशिदीच्या भोंग्यांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते आणि केवळ हिंदूंच्या सणाच्या वेळी प्रदूषण होते असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वाटते. त्यामुळे ते फक्त हिंदूंच्या विरोधात पक्षपाती कारवाई करतात. म्हणून त्यांनी हिंदूंवर 230 खटले आणि मुसलमानांवर 22 खटले भरले. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा.' असा आरोप केल्याचे वाचले.
पण भारतातील लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार खटल्यांचे प्रमाण अगदी योग्य आहे. कारण महाराष्ट्रात काय की भारतात काय हिंदूंची संख्या सुमारे 80 टक्के आणि मुसलमानांची संख्या 14 टक्के आहे. खटल्यांचे प्रमाणही जवळपास तेवढेच भरते. याचा अर्थ प्रदूषण मंडळाचे लोक कुठल्याही प्रकारे पक्षपात करत नाहीत, हेच सिद्ध होत नाही काय?
तसेच DJ कधीतरीच ...










