डेंगी आणि साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करा : युवकाध्यक्ष इम्रान शेख
पिंपरी : पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमूळे संपूर्ण शहरात जुलै पासून नागरिक सातत्याने आजारी पडत आहेत. त्यामुळे डेंगी आणि साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी केली आहे. याबाबत शहराध्यक्ष शेख यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिथे तक्रार केली जाते तेवढ्याच भागात महापालिकेच्या वतीने फवारणी केली जाते. खर तर पावसाळ्यात प्रत्येक प्रभागात सरसकट धुराची गाडी, व फवारणी केले जाणे आवश्यक असून या बाबतीत महापालिका प्रशासन उदासीन दिसून येत आहे. पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमूळे संपूर्ण शहरात जुलै पासून नागरिक सातत्याने आजारी पडत आहेत.
डेंगी, मलेरिया, सर्दी, खोकला, अंगदुखीला अटकाव करण्यासाठी महापालिक...










