HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न
हडपसर, ४ मार्च २०२५ (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, महिला सक्षमीकरण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान उपक्रम रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष तांबे व डॉ.संदीप वाकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.संतोष तांबे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची आणि क्रांतिकारकांची कर्मभूमी आहे. महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी असून त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. आजच्या तरुणांनी आपला इतिहास वाचन लेखनाच्या माध्यमातू आत्मसात केला पाहिजे. आपल्या इतिहासामध्ये झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, ताराबा...










