Tag: Marathi News

PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक
क्राईम

PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक

पिंपरी : एका तरुणाने घरात शिरून दोन महिलांना मारहाण केली. ही घटना चिंचवड येथील दळवीनगर येथे घडली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गौरव भारत कुदळ (वय २१, रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी गौरव यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून गौरव फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीने गौरव याला जाब विचारला असता त्याने फिर्यादीला सळईने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहीण आली असता त्यांनाही आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले....
HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे
विशेष लेख

HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे

आजच्या ताणतणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये कामाच्या विश्रांतीला महत्त्व दिलं जातं, कारण मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने साप्ताहिक सुट्टी घेणं खूप फायदेशीर असू शकतं. विविध कारणांमुळे साप्ताहिक सुट्टी महत्त्वाची आहे, आणि त्याचं महत्व समजून घेतल्यास आपल्या कामकाजातील कार्यक्षमता आणि जीवनातील आनंद वाढवता येतो. १. मानसिक विश्रांती आणि ताण कमी करणे साप्ताहिक सुट्टी घेतल्याने मानसिक विश्रांती मिळते. सतत काम करणं हे मानसिक ताण, थकवा आणि चिंतेला वाढवू शकतं. सुट्टी घेतल्याने कामाचा दबाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. या विश्रांतीमुळे आपण नव्या उत्साहाने कामावर परत येऊ शकतो. ताणामुळे होणारी मानसिक धकधक, नैराश्य किंवा कामावरून सुट्टी न घेतल्याने होणारी बर्नआऊट परिस्थिती टाळली जाऊ शकते. २. शारीरिक...
Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र
विशेष लेख

Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र

विलास स्वादी१ - स्टेनसिल - हां एक फूलसकेप आकाराचा टिश्यू पेपर सारखा स्क्रीन असे. या वर स्टेनसिल पेन वापरून मजकूर लिहिला जायचा किवां टाइपराइटर / टंक लिखित केला जायचा. स्क्रीन वर टंक लेखन करण्या साठी - टाइपराइटर मधील रिबन काढून ठेवावी लागे. मग नेहमी प्रमाणे टंकखन करत. या प्रकारात अक्षर सरळ स्क्रीन वरच उमटावाली जात. अक्षराच्या वळणा प्रमाणे स्क्रीन वर ठसा उमटला जाई. टाइपराइटर कीती जोराने बड़वायाचा याचे भान राखावे लागे. अक्षर चुकीचे उमटवल्यास चूक सुधारण्या साठी लाल रंगाचे सोलुशन ब्रश ने चुकीच्या अक्षरावर हल्केच लावावे लागे. हे सोलुशन ठसा भरून टाके. नंतर त्याच जागेवर योग्य अक्षर हळू वार पणे उमटावे लागे. एकन्दर टंक लेखन कौशल्याचा कस लागेल असे ते काम होते. ज्याना ते जमे ते ऑफिस मधे रुबाब दाखवत. यात घाई गड़बडीत एखाद दुसरी ओळ दुसऱ्या पानावर घ्यावी लागे. काही वरिष्ठ या वरुन शेरेबाजी करतच. ...
Family disputes : पती-पत्नी जेव्हा मुलांसमोर भांडण करतात, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो?
विशेष लेख

Family disputes : पती-पत्नी जेव्हा मुलांसमोर भांडण करतात, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो?

पती-पत्नी यांचे एकमेकांशी असलेले संबंध घरातील वातावरणावर मोठा परिणाम करतात. जेव्हा हे दोन्ही सहकारी आपसात भांडतात, तर त्याचा थेट मुलांवर परिणाम होतो. मुलांच्या मनोविकासात आणि भावनिक स्थितीत असं महत्त्वाचं बदल घडवू शकतो. यावर विचार करताना, मुलांवर होणाऱ्या परिणामांचे विविध पैलू समजून घेणं महत्त्वाचं आहे. १. भावनिक असुरक्षितता मुलं आपली सुरक्षा, प्रेम आणि संरक्षण यासाठी पालकांवर अवलंबून असतात. जेव्हा पती-पत्नी एकमेकांशी वाद घालतात, तर मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. मुलं आपल्याला घरात सुरक्षितता नाही असं समजू शकतात, ज्यामुळे त्यांचं मानसिक ताण वाढतो. २. चिंता आणि ताण भांडणामुळे मुलांना मानसिक ताण आणि चिंता निर्माण होऊ शकते. त्यांना पालकांच्या भांडणामुळे त्यांचं भविष्य, घराचं वातावरण आणि इतर गोष्टींविषयी भीती वाटू शकते. हे मुलांच्या दैनंदिन जीवनात नक...
Alandi Crime : कार भाड्याने घेत फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल
ताज्या घडामोडी, क्राईम

Alandi Crime : कार भाड्याने घेत फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, दि ११ (प्रतिनिधी) : दोन कार भाड्याने घेऊन त्या परत न देता तसेच भाड्याचे पैसे न देता एका तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथे ही घटना घडली. सुमीत सुनील कवडे (वय २८, रा. कोरेगाव पार्क, पुणे), ओंकार शशिकांत ढावरे (वय ३२, रा. यमुनानगर, निगडी), फयाज फक्रुद्दीन शेख (वय ३९, रा. विद्यानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी रोहित महादेव गिरी (वय २८, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुमीत, ओंकार आणि फिर्यादी यांच्यामध्ये एका मोटारीला दरमहा ७३ हजार रुपये; तर दुसऱ्या मोटारीला दरमहा ४८ हजार ६०० रुपये भाडे देण्याचे ठरले. फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी आगाऊ रक्कमही दिली. त्यानंतर रोहित यांच्या संमतीशिवाय एक मोटार फयाज शेख याला परस्पर विक्री करण्यासाठी दिली; तर...
MAVAL CRIME : पुसाणेतील दारूभट्टीवर छापा
क्राईम

MAVAL CRIME : पुसाणेतील दारूभट्टीवर छापा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने एका दारू भट्टीवर छापा टाकून एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मावळ तालुक्यातील पुसाणे येथे करण्यात आली. आरोपी महिलेने पुसाणे गावात ओढ्यावरील बंधाऱ्याजवळ दारू तयार करण्यासाठी गूळ मिश्रित रसायन भिजत घातले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या दारूभट्टीवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पसार झाली. दरम्यान, पोलिसांनी ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला....
RAVET : गॅस रिफिलिंग प्रकरणी तरुणाला अटक
क्राईम

RAVET : गॅस रिफिलिंग प्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून बेकायदा गॅस काढून छोट्या सिलिंडरमध्ये भरला आणि त्याची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रावेत येथे करण्यात आली. सचिन नरसिंग बिरादार (वय २३, रा. एस. बी. पाटील, रोड, रावेत) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी बिरादार याचे रावेत येथे मृणाल गॅस रिपेअरिंग सेंटर नावाचे दुकान आहे. त्याने दुकानात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून चार किलो वजनाच्या छोट्या सिलिंडरमध्ये चोरून बेकायदेशीरपणे धोकादायकरीत्या गॅस काढला. या छोट्या सिलिंडरची त्याने काळ्या बाजारात विक्री केली. खंडणी विरोधी पथकाने दुकानावर कारवाई करून १९ हजार दोनशे रुपये किंमतीचा गॅस साठा आणि इतर साहित्य जप्त केले....
WAKAD CRIME : वाकडमध्ये तरुणाकडून पिस्तुल जप्त
क्राईम

WAKAD CRIME : वाकडमध्ये तरुणाकडून पिस्तुल जप्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाकडून पिस्तुल जप्त केले. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. साद यासीन सय्यद (वय १९, रा आदर्श कॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड येथील लक्ष्मीबाई बारणे गार्डनच्या भिंतीलगत एक तरुण पिस्तुल घेऊन आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साद सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे एक पिस्तुल जप्त केले....
CHINCHWAD : रस्तप दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार
ताज्या घडामोडी

CHINCHWAD : रस्तप दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

पिंपरी : रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात चिंचवडमधील गरवारे कंपनीजवळ घडला. नयन संजयकुमार इंगळे (वय २३, रा. ऋतुजा हाउसिंग सोसायटी, महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. इंगळे हे दुचाकीवरून जात असताना गरवारे कंपनीजवळील चौकातील रस्ता दुभाजकाला आणि खांबाला दुचाकी बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नयन यांचा मृत्यू झाला....
HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
पिंपरी चिंचवड

HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

पिंपरी , दि. १० - "होळी लहान करा, पोळीचे दान करा," हे संदेश देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेने होळी सणाच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम आयोजित केला आहे. समितीने अपशब्द आणि शिव्या यांचे दहन करून, चांगल्या गोष्टी व विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले आहे. होळीला वाहण्यात येणारी पोळी संकलित करण्याचा उपक्रम अंनिसच्या वतीने २६ वर्षांपासून देहूरोड येथे यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संकलित केलेली पुरणपोळी देहूरोड येथील गरीब वस्तीमध्ये ग्रामस्थांकडून वाटप केली जाते. या वर्षीही नागरिकांना पर्यावरणपूरक, साधेपणाने घरगुती होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देहूरोड येथील चिंचोली येथील पोळी संकलन उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या सामाजिक कार्यात हातभार लावावा, असेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले आहे. समितीच्या या उपक्रमामुळे होळीच्या ...