Tag: Marathi News

WAKAD CRIME : वाकडमध्ये तरुणाकडून पिस्तुल जप्त
क्राईम

WAKAD CRIME : वाकडमध्ये तरुणाकडून पिस्तुल जप्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाकडून पिस्तुल जप्त केले. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. साद यासीन सय्यद (वय १९, रा आदर्श कॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड येथील लक्ष्मीबाई बारणे गार्डनच्या भिंतीलगत एक तरुण पिस्तुल घेऊन आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साद सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे एक पिस्तुल जप्त केले....
CHINCHWAD : रस्तप दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार
ताज्या घडामोडी

CHINCHWAD : रस्तप दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार ठार

पिंपरी : रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात चिंचवडमधील गरवारे कंपनीजवळ घडला. नयन संजयकुमार इंगळे (वय २३, रा. ऋतुजा हाउसिंग सोसायटी, महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. इंगळे हे दुचाकीवरून जात असताना गरवारे कंपनीजवळील चौकातील रस्ता दुभाजकाला आणि खांबाला दुचाकी बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नयन यांचा मृत्यू झाला....
HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन
पिंपरी चिंचवड

HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

पिंपरी , दि. १० - "होळी लहान करा, पोळीचे दान करा," हे संदेश देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेने होळी सणाच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम आयोजित केला आहे. समितीने अपशब्द आणि शिव्या यांचे दहन करून, चांगल्या गोष्टी व विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले आहे. होळीला वाहण्यात येणारी पोळी संकलित करण्याचा उपक्रम अंनिसच्या वतीने २६ वर्षांपासून देहूरोड येथे यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संकलित केलेली पुरणपोळी देहूरोड येथील गरीब वस्तीमध्ये ग्रामस्थांकडून वाटप केली जाते. या वर्षीही नागरिकांना पर्यावरणपूरक, साधेपणाने घरगुती होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देहूरोड येथील चिंचोली येथील पोळी संकलन उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या सामाजिक कार्यात हातभार लावावा, असेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले आहे. समितीच्या या उपक्रमामुळे होळीच्या ...
HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘भारतातील संशोधनाच्या संधी’ विषयावर कार्यशाळा संपन्न 
शैक्षणिक

HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘भारतातील संशोधनाच्या संधी’ विषयावर कार्यशाळा संपन्न

हडपसर | प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील लक्ष्मीबाई भावराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन (CIII) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील संशोधनाच्या संधी या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विवेक पवार (सीईओ, पुणे) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे. डॉ. अशोक नगरकर(डी.आर.डी.ओ. एच.ई.एम.आर.एल. पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पेटंट रजिस्टर करताना तत्काळ रजिस्टर केली पाहिजे. घेतली पाहिजे. फाईल कशी करायची यासंदर्भात माहिती दिली. तसेच कॉपीराईट संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शि...
PIMPRI : गाथा सन्मानाची : कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सन्मान सोहळा
पिंपरी चिंचवड

PIMPRI : गाथा सन्मानाची : कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सन्मान सोहळा

पिंपरी, दि. 9 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या वतीने "गाथा सन्मानाची" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. हा सन्मान सोहळा रविवार, ९ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजता गोदावरी आंगण, बोऱ्हाडे वाडी, मोशी येथे पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी केले. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या, विशेषतः परिचारिका, शिक्षिका, ब्युटीशियन, पोलीस कॉन्स्टेबल, तसेच इतर विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महि...
PIMPRI : पिंपरी मार्केट येथे वाहन मुक्त दिनानिमित्त लहान मुले,ज्येष्ठ नागरिक, महिलांनी घेतला मनमुराद फिरण्याचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद
पिंपरी चिंचवड

PIMPRI : पिंपरी मार्केट येथे वाहन मुक्त दिनानिमित्त लहान मुले,ज्येष्ठ नागरिक, महिलांनी घेतला मनमुराद फिरण्याचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद

महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांकडून कौतुक पिंपरी, दि. ९ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात (साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक) अशा प्रकारचा पहिलाच वाहन-मुक्त दिवस साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद अबालवृद्धांनी घेतला. लहान मुले, महिलांचा देखील मोठा सहभाग या उपक्रमात दिसून आला. वाहन मुक्त दिनानिमित्त रस्ते सुरक्षा, कमी प्रदूषण क्षेत्र, पादचारी मार्ग व सायकल ट्रॅकचे महत्त्व, सार्वजनिक वाहतूक आणि नागरिकांच्या सहभागावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. सर्व वयोगटांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रम देखील येथे पार पडले. कार्यक्रमस्थळी संपूर्ण ५०० मीटर रस्त्यावर उ...
PIMPLE GURUV : एस. पीज् हास्ययोग परिवारातर्फे महिला दिन साजरा
सिटिझन जर्नालिस्ट

PIMPLE GURUV : एस. पीज् हास्ययोग परिवारातर्फे महिला दिन साजरा

पिंपळे गुरव, दि. ९ : बट्टू जगताप उद्यान शाखा व ८ ते ८० उद्यान सुदर्शन चौक पिंपळे गुरव, शाखा यांच्या संयुक्तरीत्या जागतिक महिला दिन बटटू जगताप उद्यान पिंपळे गुरव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिवाराचे संस्थापक अॅड.प्रताप साबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन अथर्व आयुर्वेद क्लिनिकचे डॉ. निनाद नाईक, डॉ. सुवर्णा वानखडे (थोरात) वृक्षमित्र अरूण पवार, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, महादेव पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. निनाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यकमात अॅड. प्रताप सावळे यांनी पाहुण्यांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देवून करण्यात आले. कायर्कमात सर्वप्रथम स्वागतपर महिला दिनावर आधारीत " घे ग तू भरारी" हे गीत मिना कुलकर्णी, उपा लोखंडे, लक्ष्मी निंबाळकर यांनी सादर केले. वृक्षमित्र अरूण पवार व सा...
PIMPRI : कायद्याची माहिती झाल्यास स्त्री अधिक सक्षम – न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार
शैक्षणिक

PIMPRI : कायद्याची माहिती झाल्यास स्त्री अधिक सक्षम – न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार

पीसीयू स्कूल ऑफ लॉ मध्ये महिला सक्षमीकरणावर परिषद संपन्न पिंपरी, पुणे (दि. ९ मार्च २०२५) आजची स्त्री ही आधुनिक विचारांची आहे. तिच्या सक्षमीकरणासाठी तिचा स्वतःवर विश्वास हवा. नवीन कायद्याची माहिती झाल्यास आजची आधुनिक स्त्री अधिक सक्षम होईल असे मत पुणे, शिवाजीनगर न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) अमृत बिराजदार यांनी व्यक्त केले. पीसीइटी एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पीसीयू मधील स्कूल ऑफ लॉ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त "लिंग आधारित हिंसाचाराचा सामना करण्यासाठी नवीन गुन्हेगारी कायद्याद्वारे महिला सक्षमीकरण" या विषयावर आयोजित केलेल्या "पीसीयू लेक्स इम्पेरियम २०२५" या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी परिषदेस कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपाडे, सर्वोच्च न्यायालयातील ॲड. दुर्गा दत्त, त्रयमा लीगलचे संस्था...
Dehu : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया
पुणे

Dehu : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर महोत्सव पिंपरी, ता. ९ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात गुरुवर्य कुऱ्हेकर महाराजांच्या कीर्तनाने झाली. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री क्षेत्र आळंदी (Alandi) येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्य...
CHINCHWAD : नद्यांच्या संवर्धनासाठी आणि नदीकाठ विकास प्रकल्पाविरोधात पिंपरी-चिंचवडकरांचा मानवी साखळीने आवाज
पिंपरी चिंचवड

CHINCHWAD : नद्यांच्या संवर्धनासाठी आणि नदीकाठ विकास प्रकल्पाविरोधात पिंपरी-चिंचवडकरांचा मानवी साखळीने आवाज

२०० हून अधिक नागरिकांचे नैसर्गिक नदीकिनाऱ्यांसाठी एकजूट पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या रक्षणासाठी घेतला पुढाकार चिंचवड, ९ मार्च २०२५ – आज चिंचवड येथील चाफेकर चौकात २०० हून अधिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नदीकाठ विकास (RFD) प्रकल्पाचा विरोध केला आणि स्थानिक नद्यांच्या शुद्धीकरणासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांनी नदी प्रदूषण रोखणे, १००% सांडपाणी प्रक्रिया सुनिश्चित करणे आणि कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता नैसर्गिक नदीकिनारे जपण्याची गरज अधोरेखित केली. या आंदोलनात अनेक स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यावरण संघटना आणि सामाजिक प्रतिष्ठानांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. सकाळी ८ वाजता चाफेकर चौकात जमलेल्या नागरिकांनी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या आरोग्य व भविष्यासाठी चिंत...

Actions

Selected media actions