PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’
पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या भाटनगर प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. जयश्री गणेश राऊत या विशेष कार्यासाठी महापालिकेकडून 'आदर्श शिक्षिका' ठरल्या आहेत. त्यांच्या सोळा वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी विदयार्थ्याच्यासर्वागीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवले.
यात विशेष उपक्रम म्हणजे सध्याच्या काळात संगणक शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी मुलांना कोडिंगबाबत मार्गदर्शनावर भर दिला. त्यांचे विद्यार्थी स्क्रॅच या ऑनलाईन कोडिंग फलॅटफॉर्मवर कोडिंग करतात. तसेच त्यांनी विविध सर्जनशीलतेचा विकास घडवून आणणारे उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती या सुप्त गुणाचा विकास घडवून आणण्यासाठी राख्या बनविणे, गणेश मूर्ती बनविणे. पतंग तयार करणे, आकाशकंदिल बनविणे कागदी फुलपाखरे, पणत्या, भेटकार्ड, टाकाऊतून टिकाऊ वस्तू, कागदी पिशव्या बनविणे आईस्क्रीमच्या काड्यापासून वाॅल हैगिंग, फुलदाणी...