Tag: Marathi News

HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न 
शैक्षणिक

HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न

हडपसर, ४ मार्च २०२५ (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, महिला सक्षमीकरण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान उपक्रम रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष तांबे व डॉ.संदीप वाकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.संतोष तांबे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची आणि क्रांतिकारकांची कर्मभूमी आहे. महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी असून त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. आजच्या तरुणांनी आपला इतिहास वाचन लेखनाच्या माध्यमातू आत्मसात केला पाहिजे. आपल्या इतिहासामध्ये झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, ताराबा...
HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नवलेखक कार्यशाळा संपन्न 
शैक्षणिक

HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नवलेखक कार्यशाळा संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, महिला सक्षमीकरण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नवलेखक कार्यशाळा रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दिनेश पवार व प्रा.किशोर मुठेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.दिनेश पवार म्हणाले की, आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली जाते. वाचन लेखनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करता येते. आजच्या तरुणांनी वाऱ्याच्या वेगाने ग्रंथ वाचन आणि लेखन केले पाहिजे. ग्रंथातील शब्दांमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी हाती मोबाईल घेण्याऐवजी पुस्तक घ्यावे अ...
PIMPRI CHINCHWAD : रोटरी एनप्रो प्रश्नमंजुषा स्पर्धेत बजाज स्कुलला विजेतेपद 
शैक्षणिक

PIMPRI CHINCHWAD : रोटरी एनप्रो प्रश्नमंजुषा स्पर्धेत बजाज स्कुलला विजेतेपद

पिंपरी (प्रतिनिधी) - रोटरी क्लब निगडीच्या वतीने एनप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रोटरी एनप्रो आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजेतेपद चिंचवड येथील कमलनयन बजाज स्कूलने पटकावले. बजाज स्कूलचे नववीचे विद्यार्थी आदि कणसे आणि अत्तर एजाज यांनी ३८ गुणांसह प्रभावी कामगिरी केली. स्पर्धक संघ ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे येथील प्रथम ढोकले आणि अथर्व भिडे यांना मागे टाकले. त्यांनी ३२ गुणांसह उपविजेतेपद पटकावले.नवी मुंबई येथील एम्पायरियन स्कूलचे साईश्री पाटील आणि सुदर्शन एम यांनी प्रभावी कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले, एनप्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थाकीय संचालक श्रीकृष्णा करकरे, राकेश सिंघानिया, जयंत येवले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ६५ शाळांचे १०२ संघ सहभागी झाले होते.रोटरी एनप्रो इंटरस्कूल ...
PIMPRI CHINCHWAD: आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न
शैक्षणिक

PIMPRI CHINCHWAD: आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे क्रिसेंडो हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होते, असे डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. चिंचवड येथील एल्प्रो सभागृहात या क्रिसेंडो कार्य्रक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कला, क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व सांगीतिक कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ.वंदना मोहंती, डॉ.अश्विनी ब्रह्मे, प्रा.गंगाधर डुकरे, प्रा.युगं...
Hadapsar : एस. एम. जोशी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न 
शैक्षणिक

Hadapsar : एस. एम. जोशी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये मराठी विभाग, मास कम्युनिकेशन ॲंड जर्नालिझम विभाग (Mass Communication and Journalism) व वैश्विक कला पर्यावरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठी भाषा गौरव दिन' समारंभानिमित्त विद्यार्थी कवी संमेलन, गीतगायन, भित्तिपत्रक उद्घाटन व ग्रंथ प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बालाजी सूर्यवंशी (सुप्रसिध्द कवी, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर) यांनी विविध गीतकवितांचे सादरीकरण करुन, मराठी भाषेचा गौरव करीत, मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास सांगितला. भाषा हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून, विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करावे. असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या विविध कविता आणि लेख या 'युवास्पंदन' भित्तीपत्रिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्...
AADHAR केवायसी करताना ओटीपी येत नाही; असू शकतात ही कारणे
विशेष लेख

AADHAR केवायसी करताना ओटीपी येत नाही; असू शकतात ही कारणे

लोकमराठी न्यूज नेटवर्क : आधार Aadhar केवायसी करताना ओटीपी न येण्याची अनेक कारणं असू शकतात. काही संभाव्य कारणं आणि त्यांचे निराकरण खालीलप्रमाणे आहेत: १. मोबाईल नंबर: आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर: तुम्ही जो मोबाईल नंबर वापरत आहात तो आधार कार्डमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ओटीपी केवळ नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठवला जातो. मोबाईल नंबर चालू असणे: तुमचा मोबाईल नंबर चालू असणे आणि त्यावर नेटवर्क उपलब्ध असणे आवश्यक आहे. SMS सेवा: तुमच्या मोबाईल नंबरवर SMS सेवा सुरू असणे आवश्यक आहे. २. नेटवर्क समस्या: तुमच्या परिसरात खराब नेटवर्क असल्यास ओटीपी येण्यास विलंब होऊ शकतो किंवा ओटीपी येऊ शकत नाही. नेटवर्कमध्ये व्यत्यय: तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या नेटवर्कमध्ये काही समस्या असल्यास ओटीपी delivery मध्ये अडचण येऊ शकते. ३. UIDAI सर्व्हर समस्या: UIDAI सर्व्हर डाउन: UIDAI सर्व्हर डाउन...
Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात 
शैक्षणिक

Hadapsar : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात

हडपसर, दि. ४ फेब्रुवारी (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कमिटी, विद्यार्थी तक्रार निवारण समिती आणि महिला सक्षमीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाणे हळदी - कुमकुम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानवर्धिनी शाळेच्या सचिव सोनल चेतन दादा तुपे आणि सामाजिक कार्यकर्त्या व अँटी रॅगिंग विद्यार्थी तक्रार समिती सदस्य मनीषा प्रसाद राऊत उपस्थित होत्या. मार्गदर्शन करताना सोनल चेतन तुपे यांनी महिला प्राध्यापिकांना हळदी - कुमकुम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या आयुष्यामध्ये शिस्त कशी महत्त्वाचे आहे या संदर्भात अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन सोनल चेतन तुपे यांनी केले. तसेच मनिषा प्रसाद राऊत यांनी सर्व महिला प्राध्यापिकांना हळदी - कुमकुम दिनाच्या शुभेच्छा देत, स्काय गोल्ड यांच्या कडून देण्यात आलेल्या गिफ्टचे वाटप केले. कार्यक्रम...
पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे
पुणे

पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे

न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड पुणे : पत्रकारांनी आपल्या बातमी ला न्याय देताना कधीही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये. तसेच सुड बुद्धीने आपण पत्रकारिता करत नसेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. असे मत ऑल इंडिया जरनालिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार पदाधिकारी निवड करताना व्यक्त केले. न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची निवड आणि सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी वानखेडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत जोशी उपस्थित होते . यावेळी हेमंत जोशी यांनी सर्वसामान्य जनतेला आपल्या पत्रकारितेचा फायदा झाला पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील चित्र सर्वच माध्यमांनी पुढे आणले पाहिजे. सध्या नको त्या गोष्टी दाखवण्याची स्पर्ध...
GBS : जीबीएस या दुर्मिळ आजाराची लक्षणे, निदान, उपचार
आरोग्य, मोठी बातमी

GBS : जीबीएस या दुर्मिळ आजाराची लक्षणे, निदान, उपचार

जीबीएस (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) हा एक दुर्मिळ आणि गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीच्या चुकीच्या कार्यामुळे होतो. हा आजार परिफेरल नर्व्हस सिस्टमला (मज्जासंस्थेच्या मज्जातंतूंना) हानी पोहोचवतो, ज्यामुळे स्नायूंची कमकुवतपणा, झडप येणे आणि काहीवेळा पक्षाघात होऊ शकतो. जीबीएसची लक्षणे: हात आणि पायांमध्ये कमकुवतपणा आणि झडप येणे, जे वरच्या दिशेने पसरते. स्नायूंमध्ये वेदना आणि झटके येणे. चालताना किंवा शरीराचे संतुलन राखताना अडचण येणे. चेहऱ्याचे स्नायू कमजोर होणे, ज्यामुळे बोलणे, चावणे आणि गिळणे अवघड होते. दृष्टीच्या समस्या, जसे की दुहेरी दृष्टी. रक्तदाब आणि हृदयगतीमध्ये बदल. पचनसंस्थेच्या समस्या, जसे की आतड्यांची हालचाल कमी होणे. जीबीएसची कारणे: जीबीएसचे अचूक कारण अज्ञात आहे, परंतु हा आजार सहसा व्हायरल किंवा जीवाणूंच्या संसर्गानंतर सुरू होत...
Cricket खेळाचा इतिहास, तुम्हाला माहित आहे का?
क्रीडा, ताज्या घडामोडी

Cricket खेळाचा इतिहास, तुम्हाला माहित आहे का?

क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे जो जगभरात खेळला जातो. हा खेळ विशेषतः भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. क्रिकेटचा इतिहास जुना आहे आणि तो वेळोवेळी बदलत गेला आहे. खाली क्रिकेटची संपूर्ण माहिती दिली आहे: 1. क्रिकेटचा इतिहास क्रिकेटचा उगम १६व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला. हा खेळ सुरुवातीला ग्रामीण भागातील लोकांचा मनोरंजनाचा साधन होता. १८व्या शतकात क्रिकेट संघटित स्वरूपात खेळला जाऊ लागला आणि पहिला क्रिकेट क्लब हॅम्बल्डन क्लब (Hambledon Club) इंग्लंडमध्ये स्थापन झाला. १८७७ मध्ये पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. 2. क्रिकेटचे प्रकार क्रिकेटचे मुख्य तीन प्रकार आहेत: अ) कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि पारंपरिक प्रकार आहे. ...