Tag: #maval

लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न
पुणे

लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न

लोणावळा, दि.१९ (लोकमराठी) - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या तसेच, तळेगाव दाभाडे येथील कार्यकर्त्यांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोहगडावरील महादेव मंदिरात जि. प.सदस्या अलका धानिवले व गणेश धानिवले यांचे वतीने अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात आले. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते. शिवघोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमासाठी रायगड मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, प्रकाशराव मिठभाकरे,पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ...
कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे आणि विकत घेणाऱ्या आरोपीस अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुणे

कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे आणि विकत घेणाऱ्या आरोपीस अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मावळ, दि.३० (लोकमराठी) - मावळ तालुक्यातील कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे तीन आरोपी आणि विकत घेणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. डंपर चोरणारे विष्णू भगवान जाधव (रा. गोळेवाडी तळेगाव दाभाडे), ड्रायवर अमोल चौगुले , कृष्णा सीताराम देवकर (वय २५ रा. मुलुंड जि. ठाणे) आणि विकत घेणारा रवी अंकुश लष्कर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; कामशेत पोलीस स्टेशन गु.र.नं २५६/२०२२ भादवि कलम ३७९ नुसार दाखल झाला होता. विजय विठ्ठल गायकवाड वय ४८ रा.कांब्रे ता.मावळ जि. पुणे यांनी फिर्याद दिली की; दि.२९/१२/२०२२ रोजी रात्री माझा पुतण्या रोशन गायकवाड याचे मालकीचा डंपर क्र.MH 46 F 4857 हा टायर पंक्चर झाल्यामुळे पुणे मुंबई हायवे लगत कामशेत येथील HP पेट्रोल पंपावर डंपर वरील ड्रायवर अम...

Actions

Selected media actions