Tag: Mumbai Goa Highway

मुंबई-गोवा चौपदरी हायवे झाला खरा पण, आम्ही काय कमावलंय ते माहीत नाही पण, गमावतोय बरच काही…
विशेष लेख, मोठी बातमी

मुंबई-गोवा चौपदरी हायवे झाला खरा पण, आम्ही काय कमावलंय ते माहीत नाही पण, गमावतोय बरच काही…

नितिन गोलतकर, झाराप कदाचीत फोटो पाहून काळजात धस्स होईल. अगदी माझ्या झाले तसेच. पण हा फोटो नाही टाकला तर हे भीषण वास्तव डोळे उघडेल तरी कसे? कोकण म्हणजे घनदाट जंगले, आणि वन्यजीवन फुलवणारा सुंदर निसर्ग. पण सद्यःस्थितीत हायवेवरुन प्रवास कराताना एक दोन दिवसानी एक तरी वन्यजीव गाडीखाली चिरडलेला किंवा गाडीच्या ठोकरीने मृत्युमुखी पडलेला दिसतोच. त्यात सरपटणारे अजगर, सरपटोळी सारखे प्राणी. कासव, कटींदर, कोल्हे, डुक्कर, मुंगुस आणि आज तर चक्क पणदुर गावा गवळ अत्यंत दुर्मिळ असे 'चितळ'( asian spoteed deer) वाहनाच्या ठोकरीत मृत्युमुखी पडले. न्युज चॅनल वाल्यसांठी ही ब्रेकिंग न्युज असेल पण आमच्यासाठी ही हर्ट ब्रेकिंग न्युज आहे. बर्‍याच जणांना माहीत पण नसेल कदाचीत हे आपल्याकडे तळकोकणात सापडते. कारण सिंधुदुर्गात दर्शन सहसा आतापर्यंत झालेल नाही. कारण अत्यंत दुर्मिळ प्रकारात मोडणारा हा ...