Tag: Narendra Lanjewar

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक, साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन
महाराष्ट्र, मोठी बातमी

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक, साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांचे निधन

बुलढाणा : येथील भारत विद्यालयाचे ग्रंथपाल, साहित्यिक आणि अनेक साहित्यिकांना घडविणारे नरेंद्र लांजेवार यांनी रविवारी सकाळी लद्धड हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना ऑक्सिजन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मागे त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली. परंतु नंतर ती खालावली. रविवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने राज्यभरातील साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेचे सक्रिय कार्यकर्ते होते, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे ते संपादक मंडळ सदस्य होते, वार्तापत्रात त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले आहे. ...