Tag: NCP

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती 
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती

पुरोगामी विचाराने समृद्ध युवकांची नव्याने नेमणूक करणार - इम्रान शेख कष्टकरी कामगार वंचित दुर्लक्षित घटक यांच्या मुलांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार पिंपरी, ता. २९ जुलै (लोकमराठी न्यूज) : " शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. म्हणुन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान शहर कार्यकारणी आम्ही बरखास्त करत आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या वरील पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन काळ संपल्यानंतर प्रांताध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोलजी कोल्हे, आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकची नवीन कार्यकारणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या देण्या...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त 
राजकारण, मोठी बातमी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाला. हळहळू...
महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम 
पिंपरी चिंचवड

महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : महाराष्ट्र संपूर्ण देशात वाढलेली महागाई, तरुणांच्या हाताला नसणारे रोजगार, त्याच बरोबर केंद्र, राज्य आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचा वाढलेला भ्रष्ट्राचार, भाजपा नेत्यांकडून थोर पुरुषांविषयी वारंवार केली जाणारी अपमान जनक वक्तव्य, आधीच बेरोजगारी वाढली असताना महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग-धंदे, शहरात वाढलेली गुन्हेगारी या ज्वलंत विषयांवर जनतेत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जन जागर यात्रेचे आज (दि. ५ जानेवारी) पिंपरी चिंचवड शहरात आगमन होत आहे. यानिमित्ताने जन जागर कोपरा सभेचे आयोजन केलेले आहे. या जन जागर यात्रे निमीत्ताने डिलक्स चौक, पिंपरी येथे दुपारी ०३:०० वाजता, खंडोबा माळ, आकुर्डी येथे सायंकाळी ०४:३० वाजता, गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर&nbs...
गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा..
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा..

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्कपिंपरी, (दि. २६) : पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेट जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा निर्णय दोन दिवसांत मागे घ्या अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिला. देशभक्तीचे ढोंग करणारे भाजपचे नेते दुसरीकडे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्या लोकांकडे शहर सोपविणार असल्याने पिंपरी चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच या कपंनीशी संबंधीत आजी- माजी संचालक हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असून झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये ते गुंतलेले आहेत, असेही गव्हाणे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व गुन्ह्यांचा आम्ही पर्दाफाश कऱणार आह...
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. २० डिसेंबर : लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन मध्ये खास महिलांसाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिर राबविण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क व एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष संजोग वाघिरे, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, निरीक्षक शितल हगवणे, माजी महापौर मोहिनी लांडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक नाना काटे, श्याम लांडे, राहुल भोसले, युवक अध्यक्ष इमरान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, स्वाती काटे, उषा काळे, विश्रांती पाडाळे, सुरेखा लांडगे, अमिना पानसरे, कविता खराडे, पुनम वाघ, ज्योती तापकीर, उज्वला ढोरे,...
सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध 
पिंपरी चिंचवड, राजकारण

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध

अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेऊन पदमुक्त करा - अजित गव्हाणे बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. ०७ : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमधील मंत्र्यांची सातत्याने बेताल आणि बेजाबदार वक्तव्ये सुरू असून तमाम महिलांचा अवमान या मंत्र्यांकडून केला जात आहे. आमच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासारख्या संसदरत्नाबद्दल अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेली वक्तव्ये ही अत्यंत अश्लाघ्य, निंदनिय आणि निषेधार्ह आहेत. सत्तार यांनी केवळ माफी मागून चालणार नसून त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या तथा संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मत प्रदर्शित करताना अत्यंत खालच्या स्तराची भाषा वा...
अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील
महाराष्ट्र, मोठी बातमी

अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? – जयंत पाटील

मुंबई, दि. २८ ऑक्टोबर : गुजरात (Gujarat) निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र (Maharashtra) कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress party) प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारला केला आहे. वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात (Nagpur) येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर ...
शहरात विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करा – मनीषा गटकळ यांची मागणी
पिंपरी चिंचवड

शहरात विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करा – मनीषा गटकळ यांची मागणी

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक नगरी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. परंतु याच औद्योगिक नगरीमध्ये वाहतूक व्यवस्था ही संपूर्णपणे ढिसाळ झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे ती पूर्वपदावर आणावी यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल च्या वतीने उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. प्रदेशाध्यक्षा आणि खासदार अडव्होकेट सौ.वंदनाताई चव्हाण यांचे आदेशानुसार आणि शहराध्यक्ष आदरणीय अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने,काम करत असत्ताना शहरात बंद असलेले आणि ब्लिंकर झालेल वाहतूक दिवे त्वरित चालू करावेत तसेच पादचाऱ्यांना त्यांचा हक्काचा वेळ वाढवून दयावा, 10 सेकंद ऐवजी ज्या सिग्नल च्या जवळ शाळा,आहेत त्या ठिकाणी महिला आणि मुलांचा विचार करुण तो 25 सेकंदाचा करावा, तसेच जेष्ठ नागरिकांचा विचार करुण काही ठिकाण चा वेळ 15,ते 20 सेकंड करावा. अति उत्साही...
खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्ती पत्र वाटप
राजकारण

खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रवादी अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्ती पत्र वाटप

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (दि. १० ऑक्टोबर) : राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अर्बन सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय जगताप, महिला अध्यक्ष मनीषा गटकळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये २५ महिला व २५ पुरुष असे ५० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रत्येक समन्वयकांना पक्षाची जबाबदारी देताना प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्याची जाणीव करून खासदार वंदना यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व नवनियुक्त समन्वयकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनीही नवनियुक्त समन्वयकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी युवक अध्यक्ष इम्रान शेख, पक्षाचे प्रवक्ते फज...
सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ – विनायक रणसुभे
राजकारण, पिंपरी चिंचवड

सोसायटीधारकांचे राष्ट्रवादीमार्फत प्रश्न सुटणार असल्याने एकनाथरावांना पोटशूळ – विनायक रणसुभे

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. ४ ऑक्टोबर २०२२ : शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटावेत, या प्रामाणिक हेतूने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने "संवाद सोसायटीधारकांशी" हा अभिनव असा उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, सोसायटीधारकांचे प्रश्‍न सुटूच नयेत, त्याचे केवळ राजकारण करावे, आणि त्या प्रश्‍नांवर सत्ता मिळवावी, या अपेक्षेने झपाटलेल्या एकनाथ पवारांना पोटशूळ का झाला? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर प्रवक्ते विनायक रणसुभे यांनी भाजपच्या एकनाथ पवार यांना केला आहे. शहरातील सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सोसायटीधारकांशी उद्या (बुधवार) रोजी थेरगाव येथे संवाद साधणार आहेत. "संवाद सोसायटीधारकांशी" या कार्यक्रमावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी टीका केली होती. या टी...