सव्वा वर्षांत पिंपरी विभागाने बदलले १८७०० वीज मीटर | महावितरणचा महाघोटाळा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?
https://youtu.be/aGgooUJBCu0
रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : वीज बिलात तोडपाणी करत वीज मीटरच गायब करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. सुमारे सव्वा वर्षांच्या काळात महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयातून १८ हजार ७७० वीज मीटर बदलून दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा महावितरणचा महाघोटाळा असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश रोचिरमानी यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत लोकमराठी न्यूजशी बोलताना रोचिरमानी म्हणाले की, कोरोना काळात अंदाजे रिडींगद्वारे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलात तोडपाणी करत पिंपरीतील महावितरणचे काही अधिकारी व कर्मचारी वीज मीटर गायब करतात, त्यांचा हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मी स्वतः बळीचा बकरा झालो. त्यासाठी माझेही जास्त आलेले बिल कमी करून...