Tag: pcmc

PIMPRI : शिवसेनेतर्फे काळेवाडीत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

PIMPRI : शिवसेनेतर्फे काळेवाडीत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी महिलांना दुपट्टा वाटप करण्यात आला. त्यावळी योग गुरु सुरेश विटकर, सुजाता हरेश नखाते, तसलीम शेख, दत्तात्रय भट, एकनाथ मंजाळ, एकनाथ काटे, लक्ष्मण टोणपे, शंकर जाधव, आरोग्य अधिकारी आत्माराम फडतरे, कृष्णा येळवे, बाळासाहेब येडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले. तर आभार चंद्रकांत गायकवाड यांनी मानले....
Pimpri Chinchwad : ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ महानाट्यातून उलडणार येशू ख्रिस्ताचे दुखःसहन
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad : ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ महानाट्यातून उलडणार येशू ख्रिस्ताचे दुखःसहन

‘फेथ ग्रुप'कडून विनाशुल्क सादरीकरण पिंपरी : ‘गुड फ्रायडे’ सणाच्या पार्श्‍वभूमीवर फेथ ग्रुप च्यावतीने बायबलवर आधारित वधस्तंभवार खिळलेला येशूचा जीवन प्रवास ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ या मराठी महानाट्यातून दाखविण्यात येणार आहे. राखेच्या बुधवार (ता.५)पासून (ॲश वेनेस्डे) ख्रिस्ती बांधवांच्या चाळीस दिवसांच्या उपवास काळाला सुरूवात झाली आहे. त्‍यामुळे ख्रिस्ती बांधवांसाठी हे नाटक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. चिंचवडमधील सेंट ॲन्ड्र्युज हायस्‍कुलच्या मैदानावर रविवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात येणार आहे. या महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जिवंत करणार आहे. ‘वधस्तंभावर खिळलेला येशू आणि पुर्नरूत्थानाच्या दिवशी शिष्यांना दर्शन' असा येशू ख्रिस्ताचा जीवन प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव समाज बांधवांना घेता येणार आहे. ‘वधस्तंभावरील मरण यातना सहन करूनही प्रभू येशूने शांतता, मानवता ...
International Women’s Days : वंचितांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम
यशोगाथा

International Women’s Days : वंचितांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम

दोन हजारहून अधिक विधवा आणि निराधार महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला मिळवून Pimpri Chinchwad : समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या आदिती निकम यांचे कार्य प्रेरणादायक आहे. पिंपळे गुरव येथील आदिती निकम यांचा समाजसेवा क्षेत्रात एक महत्वपूर्ण ठसा उमटविला आहे. त्यांनी त्यांच्या कार्याची सुरूवात खूपच साध्या आणि दीन-हीन लोकांसाठी केली. तिच्या कष्टांमुळे अनेक विद्यार्थ्यांना, दिव्यांगांना, गरीब आणि वंचित महिलांना योग्य मार्गदर्शन मिळालं आहे. आदिती निकम यांचा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीला योग्य संधी आणि मदत मिळाली, तर तिचं जीवन बदलू शकतं. त्या शासनाच्या निराधार योजना समितीच्या सदस्या आहेत. त्या माध्यमातून त्यांनी दोन हजारहून अधिक विधवा आणि निराधार महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. दिव्यांगांला दिला कृत्रिम पाय...
PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत

पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ४) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. सुरेंद्र साहेबराव जाधव (५६) असे अटक केलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाल्हेकरवाडी येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर लाच ४ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आली. दरम्यान, मंगळवारी (दि. ४) मंडला...
PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…
क्राईम

PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…

पिंपरी :- मुलीच्या मृत्यूला पत्नीला जबाबदार धरून पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे खरे कारण बाहेर येऊ नये, आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पतीने स्वतःच मृत पत्नीच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहिल्याची घटना २५ फेब्रुवारीला पिंपळे सौदागर येथे उघडकीस आली. हिमांशू दिनेश जैन (३५, रा. सौदागर) या संगणक अभियंता पतीवर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिमांशू हा संगणक अभियंता असून आत्महत्या केलेली विवाहिता गृहिणी होती. हिमांशू याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते, त्यावरून पती-पत्नीत सतत वाद होत होते. दरम्यान, त्यांच्या एक वर्षीच्या मुलीचे २७ फेब्रुवारी २०२४ रो...
HSRP : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी, मोठी बातमी

HSRP : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) - हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांनाही बसवावी लागणार असून, यासाठी ३० एप्रिलची मुदत वाढ देण्यात आली आहे. सध्या नव्या वाहनांना ती उपलब्ध होते. मात्र, जुन्या वाहनधारकांनी अशा प्रकारची नंबर प्लेट लवकर बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. या नंबर प्लेटसाठी देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबर प्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. या प्लेटवर होलोग्राम स्टिकर, इंजिन, चेसिस क्रमांक प्रेसिंगद्वारे तयार केलेले असते. त्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यात वाढ करून ती ३० एप्रिल करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेम...
HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न 
शैक्षणिक

HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न

हडपसर, ४ मार्च २०२५ (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, महिला सक्षमीकरण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान उपक्रम रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष तांबे व डॉ.संदीप वाकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.संतोष तांबे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची आणि क्रांतिकारकांची कर्मभूमी आहे. महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी असून त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. आजच्या तरुणांनी आपला इतिहास वाचन लेखनाच्या माध्यमातू आत्मसात केला पाहिजे. आपल्या इतिहासामध्ये झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, ताराबा...
PIMPRI CHINCHWAD : रोटरी एनप्रो प्रश्नमंजुषा स्पर्धेत बजाज स्कुलला विजेतेपद 
शैक्षणिक

PIMPRI CHINCHWAD : रोटरी एनप्रो प्रश्नमंजुषा स्पर्धेत बजाज स्कुलला विजेतेपद

पिंपरी (प्रतिनिधी) - रोटरी क्लब निगडीच्या वतीने एनप्रो यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रोटरी एनप्रो आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजेतेपद चिंचवड येथील कमलनयन बजाज स्कूलने पटकावले. बजाज स्कूलचे नववीचे विद्यार्थी आदि कणसे आणि अत्तर एजाज यांनी ३८ गुणांसह प्रभावी कामगिरी केली. स्पर्धक संघ ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पुणे येथील प्रथम ढोकले आणि अथर्व भिडे यांना मागे टाकले. त्यांनी ३२ गुणांसह उपविजेतेपद पटकावले.नवी मुंबई येथील एम्पायरियन स्कूलचे साईश्री पाटील आणि सुदर्शन एम यांनी प्रभावी कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले. रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले, एनप्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थाकीय संचालक श्रीकृष्णा करकरे, राकेश सिंघानिया, जयंत येवले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत ६५ शाळांचे १०२ संघ सहभागी झाले होते.रोटरी एनप्रो इंटरस्कूल ...
PIMPRI CHINCHWAD: आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न
शैक्षणिक

PIMPRI CHINCHWAD: आयआयएमएसचा क्रिसेंडो उत्साहात संपन्न

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे क्रिसेंडो हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होते, असे डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले. चिंचवड येथील एल्प्रो सभागृहात या क्रिसेंडो कार्य्रक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध कला, क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व सांगीतिक कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ.वंदना मोहंती, डॉ.अश्विनी ब्रह्मे, प्रा.गंगाधर डुकरे, प्रा.युगं...
PCMC : गैरव्यवहार प्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. साळवे व लिपिकाची उचलबांगडी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

PCMC : गैरव्यवहार प्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. साळवे व लिपिकाची उचलबांगडी

भ्रष्टाचारात सहभागी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील (Jijamata Hospital) रोजच्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे (Sayali Nadhe) यांनी केला होता. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात दोन महिन्यात १८ लाख ६६ हजार ३८८ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. सुनिता श्रीरंग साळवे (Dr Sunita Salve) व लिपिक आकाश प्रदीप गोसावी (Akash Gosavi) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. साळवे यांची बदली यमुनानगर रुग्णालयाच्या प्रमुखपदी करण्यात आली. तर लिपिक आकाश गोसावी याची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. जिजाम...