श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात आंदोलन करणार्या कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी?
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राज्य सरकार व स्थानिक पोलिस यंत्रणेशी पत्रव्यवहार तसेच आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे. मात्र हे आंदोलन थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन दबाव आणत, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी केला.
याबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिस पोलिस आयुक्त आयुक्त कृष्णा कृष्ण प्रकाश यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी मला शुक्रवारी (ता. 22) पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिस ठाण्यात गेलो असता त्याठिकाणी आलेल्या सहायक सहायक पोलीस आयुक्ताने माझा मोबाईल काढून घेतला. मोठ्या आवाजात उर्मट भाषेचा वापर करत बोलण्यास सुरूवात केली. तसेच त्या व्हिडिओ मध्ये शिवाजी महाराजांची बदनामी झालेली नाही. त्य...