Tag: Pimpri Chinchwad

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर
पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर

पिंपरी चिंचवड : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाची निवडनुक प्रक्रिया नुकतीच शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शहरातील ज्येष्ठ नागरिक महासंघातील १३० ज्येष्ठ नागरिक संघापैकी गेली २३ वर्षे कार्यरत असलेल्या ६६५ महिला व पुरुष वृद्ध सभासदांनाबरोबर घेऊन उत्कृष्ट कार्यालयीन कामगिरी व वृद्धांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा शहरातील ज्येष्ठ नागरिक महासंघात नाव लौकिक आहे. या आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुक प्रक्रियेत खालील प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदी पदमाकर जांभळे आणि उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर, महिला उपाध्यक्षपदी शुभांगी देसाई, सचिवपदी प्रल्हाद गांगूर्डे, सहसचिव सुरेश विटकर खजिनदार मारूती महाजन, सहखजिनदार गंगाधर घाडगे यांची निवड झाली....
पिंपरी चिंचवड महापालिका शाळा आयएसओ मानांकित करा – दिपक चखाले
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

पिंपरी चिंचवड महापालिका शाळा आयएसओ मानांकित करा – दिपक चखाले

पिंपरी : शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळांचे आयएसओ मानांकित करण्यात याव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत जवळपास १४० ते १४५ प्राथमिक शाळा सुरु आहेत. यामधे मराठी शाळा १२८ तर इंग्रजी शाळा ९ व उर्दू ७ शाळा आहेत. या शाळेमधे शक्यतो गरीब, सर्वसामान्यांचे विशेष करून झोपडपट्टीत राहणारे मुले-मुली झ देशाच मोठ्या प्रमाणात शिकत आहेत. या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत आहे का? तसेच स्वच्छता, आरोग्य व पिण्याचे स्वच्छ पाणी, खेळाचे मैदान, अशा अनेक गोष्टी आहेत का? नेमके किती मुले-मुली या शाळेत शिकत आहेत, व ते शिक्षण घेताना दिसतात का? त्यांची बौद्धिक व शारीरिक प्रगती झाली आहे का? किती मुले परिस्...
विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा – सचिन साठे
पिंपरी चिंचवड

विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा – सचिन साठे

पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त साठे यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी साठे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे आणि शाम अगरवाल, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, हरीदास नायर, भाऊसाहेब मुगूटमल, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परश...
PCMC : आम आदमी पक्षाने कष्टकरी महिलांच्या हस्ते केले ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

PCMC : आम आदमी पक्षाने कष्टकरी महिलांच्या हस्ते केले ध्वजारोहण

आकुर्डी : प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पक्षाच्या वतीने आकुर्डी येथे चेतन बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते, यामध्ये स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यावेळी पक्षाच्या मागील वर्षातल्या विविध उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या कष्टकरी महिलांचे योगदान व कार्य लक्षात घेता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करत विविध सामाजिक उपक्रमात आपले योगदान देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तसेच स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबद्दल उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला. खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचे वेगळेपण यात दिसून आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम इंदुमती पुन्नासे, माधुरी अरणकल्ले व संगीता थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रजासत...
पिंपरी चिंचवड

सावित्रीबाई यांनी शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली – महापौर माई ढोरे

पिंपरी : "स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, थोर समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान अतिशय मोलाचे असुन सावित्रीबाई यांनी शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली त्यामुळे आजची स्त्री पंतप्रधान, राष्ट्रपती, महापौर पदी विराजमान होवू शकली" असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला शिक्षण दिनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पिंपरी चौक येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही १२ महिलांना महापौर माई ढोरे, उपमहापौर केशवजी घोळवे, व स्थायी समितीचे विद्यमान सभापती स...
भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप
पिंपरी चिंचवड

भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप

पिंपरी : पोलिस मित्र संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्षा व शिवसेना काळेवाडी विभाग संघटिका भाग्यश्री म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना आयडी कार्डचे वाटप करण्यात आले. पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या मार्गदर्शनाखालील या कार्यक्रमाला शिवसेनेचे हरेश आबा नखाते, गोरख पाटील, गणेश आहेर, धर्मा पवार, नंदा कापुरे, सुनंदा जांभळे, स्वप्निल पाटील, शिवाजी पाटील, सुरेखा शिंदे, योगेश शिंदे, नर्सिंग शेख, उज्ज्वला बंडगर आदी उपस्थित होते....
फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक | फटाके विक्रीस बंदी घालण्याची विशाल जाधव यांची मागणी
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक | फटाके विक्रीस बंदी घालण्याची विशाल जाधव यांची मागणी

पिंपरी : फटाक्यांतील विषारी वायू कोरोना रूग्णांसाठी प्राणघातक आहे. त्यामुळे कोव्हीड - १९ (कोरोना) या विषाणूच्या महामारीचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत फटाके स्टाॅल व फटाके विक्रीस बंदी घालण्यात यावी. अशी मागणी बाराबलुतेदार महासंघाचे युवाप्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशसचिव विशाल जाधव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. याबाबत विशाल जाधव यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण जगावर कोव्हीड १९ (कोरोना) ह्या महामारीचे संकट उभे आहे. या रोगाच्या पीडितांना श्वास घेताना सर्वात जास्त त्रास होतो. हा रोग फुफ्फुसांशी संबंधित असून जे कोरोनामधून बरे होतात, त्यांना पूर्णपणे सामान्य होण्यासाठी खूप वेळ लागतो. आता सर्वत्र कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ...