Hadapsar : एस. एम. जोशी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
हडपसर (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये मराठी विभाग, मास कम्युनिकेशन ॲंड जर्नालिझम विभाग (Mass Communication and Journalism) व वैश्विक कला पर्यावरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठी भाषा गौरव दिन' समारंभानिमित्त विद्यार्थी कवी संमेलन, गीतगायन, भित्तिपत्रक उद्घाटन व ग्रंथ प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बालाजी सूर्यवंशी (सुप्रसिध्द कवी, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर) यांनी विविध गीतकवितांचे सादरीकरण करुन, मराठी भाषेचा गौरव करीत, मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास सांगितला. भाषा हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून, विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करावे. असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या विविध कविता आणि लेख या 'युवास्पंदन' भित्तीपत्रिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्...