Tag: Pune

रक्तदान करणे हा महायज्ञ आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

रक्तदान करणे हा महायज्ञ आहे – प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

पिंपरी :“युद्धे, महायुद्धे, घात-अपघात, कोरोना, विविध आजारपणे आणि कितीतरी घटना, दुर्घटना जगाच्या पाठीवर नित्य घडत असतात. त्यावेळी लक्षावधी रुग्णांची सेवासुश्रुषा करावी लागते. त्यावेळी महत्त्वाची गरज भासते ती रक्ताची. रक्ताचा तुटवडा असेल तर वेळ प्रसंगी प्राणही जाऊ शकतो म्हणून पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती रक्तदानाची. रक्तदान हा आजच्या काळातील महायज्ञ आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान आहे.” असे विचार प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी येथे मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी या शिबिराचे उद्घाटन करताना वरील विचार मांडले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजना व N.C.C. व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्या...
थोडक्यात सांगायचे म्हणजे – डॉ सचिन लांडगे
विशेष लेख

थोडक्यात सांगायचे म्हणजे – डॉ सचिन लांडगे

धर्म आणि धर्मग्रंथांनी पूर्वीच्या काळी खूप महत्वाचे काम बजावले आहे.. समाजव्यवस्था कशी असावी? दुसऱ्याला त्रास न होता कसे वागावे? न्यायनिवडा कसा करावा? नीतीने वागणे म्हणजे काय? खरं खोटं म्हणजे काय? चांगलं वाईट कसं ठरवायचं? असे नैतिक प्रश्न त्याकाळी धर्म सोडवत असे… तेंव्हाच्या उपलब्धतेनुसार आणि निसर्गानुसार पेहराव कसा असावा, स्त्री-पुरुषांनी काय घालावे, याचेही नियम धर्मच बनवत होता. पूर्वीचे वैद्यकशास्त्र आता ईतके प्रगत नव्हते म्हणून आजार होऊ नयेत यासाठी कोणत्या मोसमात काय खावे काय प्यावे याचेही मार्गदर्शन धर्मच करत असे.. वाळवंटात पाणी जपून वापरावे लागते म्हणून फक्त आठवड्यातून एकदा अंघोळ, वाळूच्या वादळकणांपासून संरक्षण म्हणून चेहरा अन डोके झाकून घेण्याची पध्दत, अशा छोट्या छोट्या गोष्टीत देखील धर्मच मार्गदर्शन करत होता. पूर्वी सतत होत असलेल्या युद्धांमध्ये खूप मोठ्या प्रमाण...
‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे नवीन पुस्तक प्रकाशित
सामाजिक

‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे नवीन पुस्तक प्रकाशित

लोकमराठी न्यूज नेटवर्क : प्रा. डॉ. शरद गायकवाड लिखित नवा ग्रंथ 'प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा' नुकतंच छापून आलं आहे. या पुस्तकात इतिहासाच्या पानात दडलेल्या २२ महाण व्यक्तिमत्त्वांचा शोध घेण्यात आलेला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला गायकवाडांनी प्रकाशात आणले आहे. सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ, फुले-आंबेडकरी चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, नामांतराची चळवळ, कला-सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे प्रतिभावंत नायक, अशा अनेकांचा परिचय या पुस्तकातून होतो आहे. साहित्य आणि सामाजिक चळवळीत झोकून देऊन काम करणारे प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचा हा ग्रंथ विकत घेवून त्यांच्या लेखनाला पाटिंबा देणे हे मातंग समाजातील शिक्षीत लोकांचे आद्य कर्तव्य आहे, आणि मातंग समाज हा ग्रंथ घेणार, हा मातंग साहित्य परिषदेचा विश्वास आहे. या नव्या पुस्तकाचे मातंग साहित्य परिषद स्वागत करीत आहे. अशी प्र...
अवैध गौणखनिज प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी ८९ लाखांचा दंड
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

अवैध गौणखनिज प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी ८९ लाखांचा दंड

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात अनेक मोठी बांधकामे चालू असून त्याठिकाणी राजरोसपणे विनापरवाना गौणखनिज उत्खनन करण्यात येत आहे. त्यामाध्यमातून राज्यसरकारचा कोट्यवधींचा महसूल काही बांधकाम व्यावसायिक बुडवत आहेत. असेच अवैध उत्खनन झाल्याचे आढळून आल्याने मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी ताथवडे येथील क्रिसला इन्फोकॉन या बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी ८९ लाख तीन हजार ३८८ दंड भरणेबाबत नोटीस बजावली आहे. कोरोना काळामध्ये अनेक व्यवसाय कमी अधिक प्रमाणात बंद असल्याने राज्य शासनाच्या आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशा परिस्थितीत काही बांधकाम व्यावसायिक काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. याबाबत अपना वतन संघटनेच्या वतीने महसूलमंत्र्यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. सर्व्हे न १४९/१ ताथवडे याठिकाणी Krisala Enterprises ...
जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद | ॲड अविनाश चिकटे यांची महत्त्वपूर्ण माहिती
विशेष लेख

जमीन खरेदी विक्री व्यवहार व नोंद | ॲड अविनाश चिकटे यांची महत्त्वपूर्ण माहिती

भविष्यात अडचणी येऊ नये म्हणून जमीन खरेदी करते वेळी घ्यावयाची काळजी.. अ. पहिला टप्पा - जमीन खरेदी पूर्वी तपासण्याच्या महत्त्वाच्या बाबी— १. जमिनीचा चालू ७/१२ काढून त्यावर मालकांचे नावे तपसावीत. २. सदर जमीन विक्री करणार्याच्या नावावर कशी झाली आहे यासाठी किमान ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासाव्यात. ३. जमिनीत हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का? ४. जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये बँक,सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भर आहे का? ५. जमीन हि प्रत्येक्ष मालकाच्याच वहिवाटीत आहे का? ६. जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्येक्ष ताब्यात असलेले क्षेत्र यात तफावत आहे का? ७. सातबारा उतारावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात आलेली विहीर, झाडे इ.बाबत प्रत्येक्ष पाहणी करून खात्री करावी. ८. जमिनीच्या इतर ह्क्कामध्ये कुल अथवा अन्य व्यक्तीचे हक्क आहे का? ९. जमिनीच्या व्यवह...
तरसाशी सामना करणाऱ्या पंडीत गाडे यांच्या धाडसाचा सन्मान
पुणे, वायरल

तरसाशी सामना करणाऱ्या पंडीत गाडे यांच्या धाडसाचा सन्मान

व्हिडीओ पहा :https://youtube.com/shorts/kifIPA9dkdU?feature=share पुणे : खेडच्या खरपुडीत तरसाने एका बाबांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. तरुणाई तरसाला पाहून धूम ठोकताना, व्हिडीओ काढताना दिसतेय, पण अशा अचानक झालेल्या हल्ल्यात जाधव बाबांचे प्राण वाचवण्यासाठी, प्रसंगावधान राखत पंडीत गाडे बाबांच्याच हातची काठी घेऊन जिवाची पर्वा न करता त्या तरसावर तुटून पडले. आणि जाधव बाबांना हिंस्त्र तरसाच्या तावडीतून सोडले. सारे खरपुडीकर सांगतात, तिथे पंडीत गाडे नसते तर कदाचित आज जाधव बाबांच्या जिवावर बेतले असते. अशा धाडशी व्यक्तिमत्वाचे अभिनंदन व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, उमलत्या पिढीने, तरुणाईने त्यांचा आदर्श घ्यावा. या भावनेतून खेड तालुका शिक्षक संघाचे मा. अध्यक्ष धर्मराज पवळे यांनी खरपुडीत जाऊन त्यांचा सन्मान केला. यावर पंडीत गाडे म्हणाले, "रस्त्यावर अपघात...
शंभर वर्षे जुन्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे
पुणे

शंभर वर्षे जुन्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

https://youtu.be/vw2IXkyzxtU पुणे : शिवसेना खडकवासला व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील १०० वर्षांपेक्षा जुने असणाऱ्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. त्यावेळी विभाग प्रमुख निलेश गिरमे, राम तोरकडी, विजय कणसे, निलेश पोळ, सुमीत चाकणकर, अतुल घुले, लोकेश राठोड व आदित्य वाघमारे उपस्थित होते....
एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सदभावना दिवस साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सदभावना दिवस साजरा

हडपसर, पुणे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना दिवस साजरा करण्यात आला. भारतात विविधतेत एकतेची भावना दृढ व्हावी. राज्यातील विविध प्रदेशात अनेक धर्माच्या अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये ऐक्याची भावना वाढावी. यासाठी सदभावना शपथ घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय जगताप उपप्राचार्य, डॉ.संजय जडे, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ.अतुल चौरे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता....
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर
पुणे

तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर

खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार सुनील शेळके यांच्या सामुहीक प्रयत्नांना यश पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या ५४ कि. मी. लांबीच्या रस्त्यासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठीही २२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आधी पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी रस्ते विकासाच्या प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार तळेगाव - चाकण - शिक्रापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे व आमदार सुनील ...
PUNE : पुण्याचे तापमान चाळिशीपार!
पुणे

PUNE : पुण्याचे तापमान चाळिशीपार!

File photo पुणे (लोकमराठी) : पुणे शहर आणि परिसरातील दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा यंदाच्या हंगामात प्रथमच चाळिशीपार गेला आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने पुणेकरांना दिवसा घरातही उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडय़ाचा सामना करावा लागतो आहे. वाढलेल्या तापमानासह थंडावा मिळविण्यासाठी घरातील वातानुकूलित यंत्र आणि पंख्यांचा वापर वाढला आहे. तापमानातील ही वाढ कायम राहणार असून, पुढील आठवडाभर दिवसाच्या तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे शहरासह परिसरामध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवडय़ात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास होता. याच कालावधीत राज्यात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढल्याने ढगाळ स्थिती निर्माण झाली. त्यात शहराच्या क...