एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे प्राचार्यपदी डॉ. एन. एस. गायकवाड
पुणे (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित एस. एम. जोशी कॉलेज हडपसर, पुणे येथे डॉ. एन. एस. गायकवाड प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. ते रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य, पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, तसेच ‘रयत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ साताराचे ते संचालकही होते. ते रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आहेत. भारतीय भौतिकशास्त्र संघटनेचे ते आजीवन सदस्य आहेत. संशोधनासाठी युरोपियन युनियनची पोस्ट डॉक्टरेटसाठी फेलोशिप त्यांना प्राप्त झाली होती. त्याआधारे त्यांनी ‘नॕशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च बेल्व्हू पॕरिस’ येथे सव्वा वर्ष संशोधन केले आहे.
त्यांनी महाविद्यालयासाठी ‘गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ स्थापन केली. ज्यामध्ये वैयक्तिक शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. नॕक (NAAC) ...