कोविड-19 बाबतच्या जनजागृतीसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा पुढाकार

योग्य माहितीचा स्थानिक भाषेत प्रसार करून समाजातील भ्रामक समजुती दूर करण्याचा उद्देश

कोविड-19 बाबतच्या जनजागृतीसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा पुढाकार

लोकमराठी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 1 एप्रिल : कोरोना हा रोग परदेशात उद्भवला होता, परंतु आम्हाला स्थानिक गरजांनुसार आपल्या लोकसंख्येला हे समजावून सांगावे लागेल, ज्यासाठी ही स्थानिक भाषा महत्त्वाची आहे. आम्हाला आशा आहे की या सामग्रीचा वापर लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रभावी ठरू शकेल, असे मत टाटा मूलभूत संशोधन संस्थेने (टीआयएफआर) डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले.

चीनमधील वुहान शहरात प्रथम उद्भवलेल्या कोविड-19 या आजाराने आता संपूर्ण जगच व्यापले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तो साथीचा आजार म्हणून जाहीर केला असून सध्या त्याचा प्रसार 204 देशांमध्ये झालेला आहे. साथीच्या आजाराबरोबरच लोकांमध्ये काळजी, अंधश्रद्धा, भीतीचे वातावरण तयार झाले. अलगीकरण, विलगीकरण, लॉकडाउन यासारख्या अत्यंत महत्वाच्या उपायांची माहिती कशी करून द्यायची हे मोठे आव्हान होते. परस्परांमध्ये सुरक्षित अंतर का ठेवायचे? लोकांमधील अंधश्रद्धा दूर करून या साथीविषयी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची मूलभूत वैज्ञानिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेने (टीआयएफआर) आकर्षक आणि प्रकाश टाकणाऱ्या संप्रेषण साहित्याची निर्मिती केली आहे. कोविड-19 सारख्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात सुरक्षित अंतर ठेवण्याला किती महत्व आहे याविषयी विविध भाषांमधील युट्यूब व्हिडिओ संशोधकांनी तयार केले आहेत. ही संसाधने हॅरी स्टीव्हन्स यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित केलेल्या मूळ अनुकरणावर आधारित आहेत.

टीआयएफआरचे वैज्ञानिक, प्राध्यापक अर्णव भट्टाचार्य म्हणतात, “आम्ही संस्थेतील प्राध्यापक, कुटुंब आणि विद्यार्थी स्वयंसेवकांच्या माध्यमातून इंग्रजी, हिंदी, बंगाली, कोंकणी, मराठी, मल्याळम, ओडिया, तामिळ आणि तेलगू अशा नऊ भाषांमध्ये सुरुवात केली आहे.” लवकरच ही साधने गुजराती, पंजाबी, हरियाणवी आणि आसामीमध्येही प्रकाशित केली जातील.

माहिती प्रसारित करण्यात मदत करणे आणि आजूबाजूच्या वेगवेगळ्या अंधश्रद्धा दूर करणे ही या मागची संकल्पना आहे. माहिती सहज सोप्या आणि प्रादेशिक भाषेत दिली केली गेली आहे जेणेकरून ती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचेल. “हा रोग परदेशात उद्भवला होता, परंतु आम्हाला स्थानिक गरजांनुसार आपल्या लोकसंख्येला हे समजावून सांगावे लागेल, ज्यासाठी ही स्थानिक भाषा महत्त्वाची आहे. आम्हाला आशा आहे की या सामग्रीचा वापर लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रभावी ठरू शकेल, ”असे डॉ. भट्टाचार्य म्हणाले.

पुढच्या टप्प्यात घरगुती सामान वापरून मास्क बनवण्याचा प्रयत्न ही टीम करीत आहे. त्यासाठी लवकरच पोस्टर्स आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात येतील. लोकांपर्यंत पोहोचण्याचा पुढाकार घेऊन टीआयएफआर ने “चाय आणि का?” नावाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे जिथे वैज्ञानिक समाजमाध्यमांद्वारे लोकांमधील गैरसमज दूर करून या विषाणूविषयी वैज्ञानिक माहिती त्यांना देतात.