दिल्ली येथील आरडी परेडसाठी तेजस मोरे, संकेत यादव, ऋतुजा दळवी यांची निवड

दिल्ली येथील आरडी परेडसाठी तेजस मोरे, संकेत यादव, ऋतुजा दळवी यांची निवड

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील तेजस मोरे, संकेत यादव यांची २६ जानेवारी रोजी झालेल्या राजपथ परेडसाठी तर ऋतुजा दळवी हिची दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या प्राईम मिनिस्टर दिल्ली रॅलीसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कॅडेट्सला एन.सी.सी.चे लेफ्ट. प्रा. रमेश गावडे यांनी मार्गदर्शन केले. एन.सी.सी.च्या कॅडेट्सच्या या यशामध्ये महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचा मोलाचा सहभाग आहे.

Actions

Selected media actions