न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के

पिंपरी चिंचवड : राहटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल जाहीर झाला आहे.

चौधरी निशा बाबूलाल हिने 97.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवला. तर परमार साहिल जगदिश याने 90.80 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे.

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के

सोळंकी आरती महेंद्र हिने 87.80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक तर चौधरी कमलेश मांगीलाल याने 87.20 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला आहे. तसेच चौधरी पूजा सखाराम हिने 85.60 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे.

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के

संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मलाताई कुटे, संदीप चाबुकस्वार, संजय कुटे, राम शिंदे, वसंत निवगुणें, सचिन आवटे, मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा भट यांनी केले तर सचिन कळसाईत यांनी आभार मानले.

Actions

Selected media actions