सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे गौरवोद्गार

सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे गौरवोद्गार

पिंपळे सौदागर : काही गणेश मंडळे मोठमोठे लाउडस्पीकर लावून मोठ्याप्रमाणात ध्वनी प्रदूषण करतात. मात्र, सुवर्णयुग मित्र मंडळाने सामाजिक कार्यक्रम घेऊन लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुवर्णयुग मित्र मंडळ पिंपळे सौदागरमधील एक आदर्श मंडळ आहे. असे गौरवोद्गार उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांना येथे मंडळाचे कौतुक करताना काढले.

सुवर्णयुग मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवामध्ये लहान मुलांसाठी कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील

विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे व फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यावेळी कुंदा भिसे बोलत होत्या.

त्याप्रसंगी विकास काटे, पंडितजी मित्रा, जोराराम परमार, अभिजित म्हेत्रे, विनायक म्हेत्रे, हेमंत मोपारी, प्रशांत काटे, सोनाली काटे, स्वाती काटे, कोमल काटे, वंदना वानखेडे, सुप्रिया श्रीवास्तव, सात्वशीला भोसले, तृप्ती चव्हाण व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष निलेश काटे व उपाध्यक्ष तुषार काटे यांनी एक आदर्श कार्यक्रमाचे आयोजन केले व लहान मुलांचा या स्पर्धेस उस्फुर्त सहभाग पाहायला मिळाला.

हे आहेत विजेते

ब्राऊन बेल्ट : तनिष्का काटे, दिशा पटेल, नम्रता मय्या.

ग्रीन बेल्ट : प्रियंका वानखेडे, आदर्श वानखेडे, साहिल जांगीर.

ऑरेंज बेल्ट : राघव, सारा श्रीवास्तव, ग्रंथ कुंजीर.

यल्लो बेल्ट : वेदांत काटे यल्लो बेल्ट.

स्पर्धकांना कराटे कोच राजिया इस्रारा खान व शिवराज लष्कर राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

कुंदा भिसे म्हणाल्या, “काही मंडळेच गणेशउत्सवानिमित्त असे समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करतात. इतर मंडळांनी सुवर्णयुग मित्र मंडळासारखे सामाजिक कार्यक्रम घेऊन लहान मुलांचे प्रोत्साहन वाढवले पाहिजे, तसेच निसर्गासाठीही उपक्रम राबवले पाहिजे.”

भिसे पुढे म्हणाल्या की, “उन्नति सोशल फाउंडेशन तर नागरिकांच्या सेवेत तत्पर असतेच. येथून पुढे देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल, तर त्या वेळेस हॉलची सोय उन्नति सोशल फाउंडेशनतर्फे केली जाईल.”

मंडळाच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित्यांचे आभार विकास काटे यांनी मानले.