महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट

महापौर माई ढोरे यांची मोशी कचरा डेपोला सदिच्छा भेट

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवड : शहराच्या महापौर माई ढोरे यांनी शुक्रवारी (ता. १३ ऑगस्ट) मोशी कचरा डेपोला अचानक सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महापौरांनी कचरा डेपोची व्यवस्थित पाहणी केली.

कचरा डेपोमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती घेतली. महापौर कचरा डेपोमध्ये येणार, यामुळे डेपो प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली होती. यावेळी कचरा डेपोचे प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी यांनी महापौरांचे स्वागत केले. त्याचबरोबर कचरा डेपोच्या सुरक्षिततेकरिता नेमण्यात आलेल्या सुतीस्का सिक्युरिटी गार्ड यांच्याकडून महापौरांना मानवंदना देण्यात आली.