चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये ८ मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव ऍड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा व सहाय्यक सचिव अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी सर्व महिला शिक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी निरंतर शिक्षण प्रक्रिया जिल्हा परिषद, पुणे विभाग शिल्पा रोडगे यांनी शाळेस भेट दिली व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे स्वागत व सत्कार प्रशालेच्या प्राचार्य नवले एस. एस यांनी केले.
महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, जिजाऊ इत्यादी महिलांच्या वेशभूषा केल्या होत्या. याप्रसंगी प्रशालेतील सर्व महिला शिक्षकांचा व महिला पालकांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक देवकाते सुभाष यांनी केले त्यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. छाजेड जे. एस. व गायकवाड सुवर्णा यांनी आपले विचार मांडले.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. विद्यालयाच्या प्राचार्य नवले एस. एस. यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका जैन एम. एम. विभाग प्रमुख शिरसाट संतोष तसेच शिक्षक प्रतिनिधी सावळे एस एस व सोनवणे एस. ए. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पितळीया राजेंद्र यांनी केले व कार्यक्रमाचे आभार लोखंडे रेखा यांनी मानले.