पिंपरी (बाळासाहेब मुळे) : येणाऱ्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, आणि त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार आपल्या आपल्या प्रभागामधून पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागलेले आहेत.त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक छोटेखानी बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे उपाध्यक्ष अनंत सुपेकर यांनी असा ठराव मांडला की आपल्या प्रभागामधून युवा नेते आणि सर्वांच्या मदतीला धावून येणारे सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सुनील कुसाळकर यांनाच पक्षाकडून तिकीट मिळावे आणि या ठरावाला प्रभागाचे अध्यक्ष अविनाश आरडकर यांनी अनुमोदन दिले आणि नंतर बैठकी मधील सर्व उपस्थितांनी आपसात चर्चा करून एक मताने सुनील कुसाळकर यांच्या नावाला पसंती दिलेली आहे.
कारण, सुनील कुसाळकर हे सतत नागरिकांच्या तक्रारीला वाचा फोडण्याचे काम करीत आहेत, प्रभागांमध्ये आजपर्यंत त्यांच्यामुळे बऱ्याच अडचणी सुटलेया आहेत गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे, यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले आहे. त्यामुळे सुनील कुसाळकर हे तर भागातील सर्व नागरिकांची आणि खास करून युवक वर्गाची पसंती आहेत.
याप्रसंगी सुनील कुसाळकर यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार मानले आणि भविष्यामध्ये माझ्यावर दाखवलेला विश्वासास मी पात्र ठरवूनच दाखवेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व शरद पवार साहेबांचा विचार मी तळागाळापर्यंत पोहोचविणार असा शब्द दिला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अनंत सुपेकर, संदीप कुसळकर, बापू कळसाईत, अविनाश आरडकर, विनोद इंगळे, महावीर समिंदर, संजय वेताळ, महेश सोनावणे, दिनेश ठोंबरे, अमोल ठानबीर, दीपक कांबळे आणि युवा नेते चेतन कदम इत्यादी मान्यवर बैठकीला उपस्थित होते.