KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन

KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन 

कर्जत : धाकट्या पंढरीत सुप्रसिद्ध अभिनेते प्रा. मनमोहनदास यांच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ब्रँड YK हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेविका वैशाली कांबळे राजगुरू, निर्मला खुडे, एडीसीसी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी संचालक बाळासाहेब साळुंके, बाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, विक्रम कांबळे, खंडू खुडे, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, वाय. के हॉटेलचे संचालक अमर काळे, सरपंच अशोक जायभाय, परशुराम जायभाय यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता कर्जतकरांना हॉटेल वाय. के.च्या माध्यमातून अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. उत्कृष्ट सेवा, स्वच्छता व क्वालिटी हे हॉटेल वाय. के.चे वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र गायकवाड यांनी केले.

  • कोठे आहे YK हॉटेल :काळदाते कॉम्प्लेक्स समोर, मेन रोड कर्जत

Actions

Selected media actions