कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन

कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन

मुंबई (लोकमराठी) – ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि नाटककार किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी मुंबईतील बॉम्बे रग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरकर यांचं मराठी आणि इंग्रजीमध्ये मोठं लेखन आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

सात सक्कम त्रेचाळीसह या कांदबरीसह त्यांच्या अनेक नामवंत साहित्याच साहित्य क्षेत्रासाठी मोठं योगदान आहे.

सन 2001 मध्ये इंग्रजी साहित्य अकादमीचा पुरस्कारही नगरकर यांना मिळाला होता. किरण यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया पत्रकार अस्मिता मोहिते यांनी दिली आहे. दरम्यान, मेंदूत रक्तश्राव झाल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.