गणेशमूर्ती परवानगीच्या भूई भाड्यात महापालिकेने केली सहापट वाढ

गणेशमूर्ती परवानगीच्या भूई भाड्यात महापालिकेने केली सहापट वाढ

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आकारल्या जाणाऱ्या गणेशमूर्ती परवानगीच्या भूईभाड्यात वाढ करण्यात आली आहे. एक हजार रुपयांवरुन सहा हजार रुपये करण्यात आले आहेत. प्रदूषण निर्मूलन शुल्काचे कारण देत तब्बल पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे गणेश मूर्ती विक्रेत्यांवर संक्रांत ओढवली आहे.

गणेशोत्सवात पाश्र्वभूमीवर गणेशमूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांकडून शहरात तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात दरवर्षी शेकडो स्टॉल्स उभारले जातात. महापालिकेकडून स्टॉल्सला परवानगी देताना भूईभाडे आकारले जाते. गतवर्षी एक हजार रुपये भूईभाडे अधिक जीएसटी (वस्तू व सेवा कर) असे परवाना शुल्क महापालिकेने आकारले होते. त्यामुळे अधिकृतपणे परवाना घेऊन स्टॉल्स उभारणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, यंदा महापालिकेने सहापटीने भूईभाडे वाढविले आहे.

Actions

Selected media actions