काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर

पिंपरी चिंचवड : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाची निवडनुक प्रक्रिया नुकतीच शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

शहरातील ज्येष्ठ नागरिक महासंघातील १३० ज्येष्ठ नागरिक संघापैकी गेली २३ वर्षे कार्यरत असलेल्या ६६५ महिला व पुरुष वृद्ध सभासदांनाबरोबर घेऊन उत्कृष्ट कार्यालयीन कामगिरी व वृद्धांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा शहरातील ज्येष्ठ नागरिक महासंघात नाव लौकिक आहे. या आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुक प्रक्रियेत खालील प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले.

अध्यक्षपदी पदमाकर जांभळे आणि उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर, महिला उपाध्यक्षपदी शुभांगी देसाई, सचिवपदी प्रल्हाद गांगूर्डे, सहसचिव सुरेश विटकर खजिनदार मारूती महाजन, सहखजिनदार गंगाधर घाडगे यांची निवड झाली.

या निवडणूक प्रक्रियेकामी निवडणूक निर्णयक अधिकारी पोपटराव माने व सहाय्यक अधिकारी म्हणून दिलीप पंडित यांनी काम पाहिले. या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहसरचिटणीस मधुकर कसबेकर, काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दशरथ वीर, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील तसेच संघाचे सर्व पदाधिकारी व संचालकांच्या उपस्थितीत पार पडला.

तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदमाकर जांभळे यांनी केले तर सुखदेव खेडकर यांनी मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.