प्रतिनीधी शंकर सदार/ शंभर टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरणा विषयी माहिती दिली जात आहे. गावात ही योजना आखली खडकी सदार येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व ग्रामपंचायत सरपंच सरला आत्माराम सदार यांनी.
यामध्ये गावातील नागरिकांचे लसीकरण न झालेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे, त्यांनी घरी जाऊन लसीकरण घेण्यास वेळोवेळी सांगितले आहे. तसेच सध्या गावामध्ये ८० टक्के लसीकरण झाले असल्याचे यावेळी सरपंच सरला सदार यांनी सांगितले आहे. अवघ्या काही आठवड्यात गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल अशी माहीती त्यांनी यावेळी दिली आहे.
यामध्ये गावचे आरोग्य सेवक लाखाडे सर, घुगे मँडम , ग्रामपंपाचय सदस्या पूनम अनिल सदार, अर्चना कैलास सदार ,ग्रामपंचायत संगणक परिचालक विकास सदार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कवर सर, गाडे सर, मानवतकर सर, बिल्लारी सर, अंगणवाडी सेविका, इंदू सदार, गावची आशा गावचे प्रतिष्ठीत नागरिक विठ्ठल कोंडूजी सदार या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे, असे त्यांनी माय मराठीशी बोलताना सांगितले.
यावेळी गावातील नागरिकांनी योग्य रित्या सहर्काय केले तसेच गावतील गरोधऱ महिला व अपंग नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले आहे. आता पर्यंत गावात ८ वेळ लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोदवला असल्याने गावात ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.