
पिंपरी : ‘२०१९ सालापासून करोना महामारीचे संकट हे जगभरात पसरले आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वच जण वेगवेगळ्या उपाययोजना शोधत आहेत. लसीकरण ही या करोनाच्या महामारीपासून सुरक्षित ठेवणारी महत्त्वाची उपाययोजना आहे. लसीकरणामुळे व्यक्तिची प्रतिकारशक्ती वाढते. भारत सरकारने देशभरात १००% लसीकरणाचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपणही आपल्या महाविद्यालयात लसीकरण मोहिम राबवित आहोत, याद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचेच १००% लसीकरण केले जाईल.’ असे मत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने युवा स्वास्थ्य सप्ताह आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने २७ व २८ ऑक्टोबर २०२१ रोजी भव्य लसीकरण मोहिम महाविद्यालयात राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात प्राचार्य डॉ . पांडुरंग गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेसाठी नवीन जिजामाता हॉस्पिटल पिंपरी येथील डॉ. तीरूमणी, डॉ लोखंडे, प्रज्ञा जगताप, मोनाली लोहार, शुभांगी भाजपुजे, सविता वेदपाठक, संतोष शिंगाडे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना या विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदिप नन्नावरे, डॉ. भारती यादव, डॉ. मिलिंद भंडारे तसेच विद्यार्थी विकास समितीचे चेअरमन डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाचे प्राचार्य प्रा. शहाजी मोरे महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमीकक्षाचे समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. विजया पोकळे यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळाचे चेअरमन डॉ. पांडुरंग भोसले यांनी आभार मानले.
- ‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
- या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
- सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
- पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती
- आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे