मातंग समाजाचे दिवंगत नेते ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या मुलाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

मातंग समाजाचे दिवंगत नेते ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या मुलाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

पिंपरी : निगडी-यमुनानगरमधील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील संशोधन केंद्रातील संशोधक हेमंत अरुण देवकुळे यांना पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच पीएच. डी. प्रदान केली. त्यांनी औषधनिर्माण शास्त्रातील ‘सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ या क्षेत्रात ‘एड्स या रोगांवर नैसर्गिक पॉलिमर वापरून अत्याधुनिक संशोधनचा वापर हा प्रबंध सादर केला.

भोसरीतील येथील एजीओ या कंपनीमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेतली असून, त्या संशोधनाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. स्मिता पिंपळे यांनी मार्गदर्शन केले. या संशोधनासाठी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण चौधरी यांनी आधुनिक पद्धतीचे साहित्य उपलब्ध करून एक आधुनिक उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविला. हेमंत देवकुळेच्या या यशाबद्दल मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ धनंजय भिसे आणि मातंग साहित्य परिषदेचे समन्वयक असाराम कसबे यांनी त्यांचे अभिनंदन केले.