रहाटणी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, कोविड योद्धांचा सन्मान व हळदी-कुंकू कार्यक्रम असे विविध समाजोपयोगी उपक्रम गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आले. या कार्यक्रमांचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष गणेश नखाते, सुमन नखाते, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर व संदीप नखाते, देविदास आप्पा तांबे, नरेंद्र माने, मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, विनोद नखाते, माधव मनोरे, दिपक जाधव, नामदेव शिंत्रे, किशोर नखाते (युवा महाराष्ट्र केसरी), निलेश नखाते (पिंपरी चिंचवड केसरी), प्रशांत मोरे, मनोज नखाते, आशुतोष नखाते, अमोल नखाते, सुभाष दराडे, नंदुशेठ गोडांबे, भगवान गोडांबे, बाळासाहेब गावडे, स्वप्निल नखाते यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून त्या अनुषंगाने रक्तदान शिबिर घेण्यात आले, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्राणवायू देणारी झाडे लावली. तर कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांचे जीव वाचवले अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला, आणि आपले सुखदुःख वाटून घेऊन मन मोकळे व्हावे, या अनुषंगाने महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभात आयोजित केला. या कार्यक्रमांना आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य लाभले. असे गणेश नखाते यांनी सांगितले.
गणेश नखाते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे. नागरिकांना मुलभूत सुख-सोयी मिळण्यासाठी त्यांचा कायमच प्रयत्न असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या हितासाठी आपलाही हातभार लागावा, यासाठी हे उपक्रम राबविण्यात आले.