- नांगरे यांना काळेवाडीतील अनेक बहिणींनी बांधल्या राख्या
काळेवाडी, ता. १३ : रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रवि रमेश नांगरे यांच्या कार्यालयात रक्षाबंदन उत्साहात साजरे करण्यात आले. लहान मुलीपासून वयोवृद्ध बहुसंख्य महिलांनी रवि नांगरे यांना राख्या बांधून बहिण भावाच्या पवित्र नात्याची प्रचिती करून दिली. यावेळी नांगरे यांनी आपल्या बहिणींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे त्यांना आरोग्य, शिक्षण व सामाजिक सुरक्षितता पुरविण्याचे वचन दिले.
त्याप्रसंगी रॉयल फाउंडेशनचे उपाध्यक्ष आनंद काटे, सचिव प्रकाश नांगरे, कार्याध्यक्ष अजय काटे, खजिनदार गणेश नांगरे, सदस्य विकी साळवे, प्रथम नांगरे, सल्लागार महेंद्र सोनवले, पंकज पाटोळे, अशोक गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या राधा काटे, आशा नांगरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी अनेक महिला म्हणाल्या की, रॉयल फाउंडेशनचे कार्यालय आपले घर असल्यासारखे वाटते. इथे आपल्या समस्या घेऊन आल्यानंतर शंभर टक्के त्या सोडवल्या जातील, याची खात्री मिळते. तसेच रवी नांगरे यांच्या रूपाने आम्हाला भाऊ भेटला असून एका भावाचे कर्तव्य त्यांनी बजावले याचे समाधान वाटते, अशा भावना काही महिलांनी यावेळी व्यक्त केल्या.
लोकमराठी न्यूजशी बोलताना रवि नांगरे म्हणाले की, स्त्री हा समाजाचा महत्त्वाचा घटक असून समाजाच्या उन्नतीत तिचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र, समाजातील काही समाजकंटक स्त्रियांना कायमच दुय्यम स्थान देण्यात धन्यता मानतात. त्यांचा राजकीय हेतूसाठीच वापर होतो. हेतू संपल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक स्त्री ही कोणाची तरी बहीण आई किंवा मुलगी असते, त्यामुळे त्यांचा सन्मान करणे, आपणास सर्वांची जबाबदारी आहे. त्याचा अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बहिणींचे माझ्यासारख्या भावावरील प्रेम पाहून अंतकरण भरून आले व पुढे अजून जोमाने काम करण्याची एक स्फूर्ती मिळाली.