पिंपरी : आम आदमी पार्टीच्या नवव्या स्थापना दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे जेवण वाटप करण्यात आले. या आधी ही सावली निवारा केंद्रात अनेकदा भेट देऊन असे उपक्रम घेण्यात आले आहेत. आज सावली निवारा केंद्राचे प्रबंधक गौतम थोरात यांनी तिथल्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारा संचालित ह्या केंद्रात राहणाऱ्या लोकांचे कौशल्य पाहून त्यांचा अभिमान वाटला. अनेकांशी आपुलीकीने गप्पा मारल्या. अस बोलतांना आप पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा यांनी सांगितले.
तसेच २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे महत्व आप पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले, व 26 /11 मुंबई येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला. आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कायम सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दिल्लीमधे कायम जनहिताचे निर्णय घेतले आहेत. जनतेला मोफत सुख सुविधा पुरवल्या आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कायम असे उपक्रम घेत आसतात. अस बोलतांना आप पिंपरी चिंचवड कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट यांनी म्हटले.
या वेळी वाहब शेख व स्वप्नील जवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केल या प्रसंगी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, सामाजिक न्याय विंग अध्यक्ष वहाब शेख, आप पिंपरी-चिंचवड और कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट, माधुरी गायकवाड, स्वप्नील जेवळे सचिव भोसरी विधान सभा, अमर डोंगरे, ब्रम्हानंद जाधव, आशुतोष शेळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.