ठाणे : श्री योगा सेवा प्रतिष्ठान सावरकर नगर ठाणे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. सर्व प्रथम झेंडा वंदनाचा कार्यक्रम करण्यात आला, श्री योगा सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिष्ठानच्या साईबाबा यांच्या नवीन देव्हाऱ्याचे ह्यावेळी उदघाटन करण्यात आले. अनिता गुप्ता, सुषमा गुप्ता यांनी देशभक्तीपर गीते गायली, माजी रेल्वे पोलीस पवन सिंग यांनी स्वातंत्र्याची महती सांगणारे भाषण केले. नगरसेवक दिलीप बारटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यावसायिक अंकुश जोष्टे यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
अध्यक्षा सुनीता श्रीवास्तव, उपाधक्ष्या विनिता राजन,खजिनदार वैशाली सावंत, सभासद पांकजम शाशिधरण, सिधार्थी पुजारी, सुमा सुब्रमण्यम, कांचन पावसकर, अनिता गुप्ता, मधू केन, मंजुला गोसावी, माधुरी निखरागे, रेखा महीरे, नीलम सिंह, इंदुमती थोरात, मीराबाई अंदेकिवर, ममता सिंह यांच्यासह विविध शेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास अबालवृदांचे सहकार्य लाभले.