एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : स्वतःची ब्युटी सलून, स्पा थेरपी अँड मॅनेजमेंट, ब्युटी कौन्सेलर, मेकअप आर्टिस्ट, मेकअप ट्रेनर, हेअर ड्रेसर, हेअर डिझायनर, न्यूट्रिशन डायजेशन कन्सल्टंट, फिटनेस ट्रेनर अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ब्युटी आणि वेलनेस पदवीस्तरीय कोर्स करणे आवश्यक आहे. कठोर परिश्रम करून आपण स्वावलंबी जीवन जगले पाहिजे. असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलांबरी थोरात यांनी बी.होक. विभाग आयोजित एक दिवसीय ब्युटी अँड वेलनेस च्या सेमिनारमध्ये व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, कौशल्यपूर्ण कोर्स करून जीवनात यशस्वी व्हा. आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण व सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. विद्यार्थ्यांना पदवीबरोबर कौशल्याचे धडे या कॉलेजमध्ये दिले जातात. आपल्या भावी जीवनासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण उपयुक्त ठरते. असे मत प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी व्यक्त केले.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ब्युटी अँड वेलनेसचे शिबीर संपन्न

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सरोज पांढरबळे यांनी तर आभार प्रा. बी. के. वाघमोडे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. रंजना जाधव, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, आय.क्यू .ए .सी. चे समन्वयक डॉ. किशोर काकडे तसेच सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Actions

Selected media actions