Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
पुणे (लोकमराठी न्यूज) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासन...